नाशिकच्या कामटवाड्यात जबरी घरफोडी ; बारा तोळे सोने, चांदीचे कॉईन लंपास | पुढारी

नाशिकच्या कामटवाड्यात जबरी घरफोडी ; बारा तोळे सोने, चांदीचे कॉईन लंपास

सिडको : पुढारी वृत्तसेवा : परिसरातील कामठवाडे भागात अज्ञात चोरट्याने फ्लॅटचे लॅच तोडुन आत प्रवेश करून बारा तोळे वजनाचे सोने व चांदीचे कॉईन असा मुदेमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. माहिती मिळताच घटना स्थळी श्वान पथक बोलावण्यात आले होते.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कामठवाडे भागातील शंभुराजे नगरमधील रहिवासी सुरेश होळकर हे २६ फेब्रुवारी रोजी लग्नाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी सिलवासा येथे गेले होते. तेथुन आज बुधवारी(दि. २) आले असता त्यांना फ्लॅटचे लॅच तुटलेले दिसले. आत बघितले असता अज्ञात चोरट्यांनी कपाटातील सुमारे बारा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व चांदीचे कॉईन लंपास झाल्याचे दिसून आले. त्यांनी तात्काळ अंबड पोलीस ठाणे गाठले. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगिरथ देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वान पथक बोलविले मात्र काही अंतर गेले. मात्र पुढे चोरट्यांची दिशा काही दिसली नाही. याप्रकरणी अंबड पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक उत्तम सोनवणे करीत आहे.

हेही वाचा :

Back to top button