जळगाव : सराफाला लुटणारे दरोडेखोर 24 तासात एलसीबीच्या जाळ्यात | पुढारी

जळगाव : सराफाला लुटणारे दरोडेखोर 24 तासात एलसीबीच्या जाळ्यात

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव विखरण रस्त्यावरील सराफाला पिस्टलचा धाक दाखवून सोने, चांदी व त्याच्याकडील मोटार सायकल हिसकावून 9 लाखाचा दरोडा घालणाऱ्या दरोडेखोरांना एलसीबीने अटक केली.

एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव विखरण रस्त्यावरील चोरटक्की गावाजवळ खंजा येथील सराफ राजेंद्र बबन विसपुते यांना पिस्टलचा धाक दाखवून दि. 16 रोजी भरदुपारी सोने, चांदी व त्याचे कडील मोटार सायकल असे 9 लाखाचे ऐवज हिसकावून गेले होते. त्यावरुन पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना तपासा बाबत आदेश दिले. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे स्वतंत्र पथक तयार करुन त्यात पोह विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, सुनिल दामोदरे, महेश महाजन, अक्रम शेख, सुधाकर अंभोरे, अश्रफ शेख, गोरख बागुल, पोना नितीन बावीस्कर, राहूल पाटील, अविनाश देवरे, प्रमोद लाडवंजारी, किरण चौधरी, राहूल बैसाणे, चालक राजेंद्र पवार, चालक मुरलीधर बारी असे व तांत्रिक मदतीकरीता पोलीस उप निरीक्षक अमोल देवढे, पोह संदिप सावळे, पोकॉ ईश्वर पाटील या पथकाची नेमणूक करण्यात आली होती.

घटनास्थळी जावून पाहिले असता गुप्त माहिती मिळाली की, फिर्यादीची मोटार सायकल एम.एच.१९ सीबी ९७८१ हि डिंगबर उर्फ डिग्या सोनवणे याच्या ताब्यात असून त्याच्या सोबत इतर २ इसम आहेत. त्यावरून एलसीबी पथकाने डिंगबर उर्फ डिग्या रविंद्र सोनवणे, वय २३, रा. भोकर ता.जि.जळगाव ह.मु. वाल्मीक नगर जळगाव, विशाल अरुण सपकाळे, वय २२, रा. कोळीपेट विठ्ठल मंदिर जवळ जळगाव, विशाल लालचंद हरदे, वय २६, रा.चौगुले प्लॉट, जळगाव अश्या तिघांना ताब्यात घेतले या गुन्हा करतेवेळी संदिप राजु कोळी, वय १९, (रा.कुन्हंगी) आकाश उर्फ धडकन सुरेश सपकाळे, रा.कोळीपेठ जळगाव या दोघांनी रेकी केली असल्याचे सांगितले वरून गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्याचे कडून फिर्यादीची मोटार सायकल व गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे.

हेही वाचा :

Back to top button