जळगाव : पुढारी वृत्तसेवा
भाजप हा पक्ष ओबीसी विरोधात असून, त्यांनी राज्याला इम्पिरिकल डेटा दिलेला नाही. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांनी सांगितले. ते पाचोरा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयाजवळील प्रांगणात शरद युवा संवाद यात्रेनिमित्त बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आ. दिलीप वाघ होते. युवकांना मार्गदर्शन करताना मेहबूब शेख यांनी सांगितले की, केंद्रातील भाजप हा पक्ष सर्वच स्तरावर अपयशी ठरला असून, सर्वसामान्य नागरिकांना जगणे असह्य झाले आहे. या संवाद यात्रेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडत गिरीश महाजन यांचे नाव न घेता पिस्तुल्याची उपमा दिली. भाजपने राजकीय संस्कृती धुळीस मिळविल्याचेही त्यांनी नमूद केले. युवकांनी घराघरापर्यंत पोहोचून पक्ष बळकट करण्याचे आवाहन दिलीप वाघ यांनी केले.
युवकांचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, जिल्हा प्रवक्ते खलील देशमुख, पी. टी. सी.चे अध्यक्ष संजय वाघ आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमात मजहर पठाण, नितीन तावडे, रवींद्र पाटील, योगेश देसले, शेख रसुल शेख उस्मान, विकास पाटील, अभिजित पवार यांनीदेखील युवकांना मार्गदर्शन केले.
दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.