देवळा-मालेगाव रस्त्यावर 45 लाखांचा गुटखा जप्त, वाहनचालक ताब्यात | पुढारी

देवळा-मालेगाव रस्त्यावर 45 लाखांचा गुटखा जप्त, वाहनचालक ताब्यात

देवळा : पुढारी वृत्तसेवा ;  नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने केलेल्या कारवाईत देवळा ते मालेगाव रस्त्यावर पिंपळगाव वाखारी परिसरात ४५ लाखांचा गुटखा जप्त केला असून, आरोपी वाहनचालकाला अटक करण्यात आली आहे.

या घटनेबाबत देवळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकातील पो नि बापू रोहम, स पो नि सचिन जाधव, सहाय्यक फौजदार बशिर तडवी, हे कॉ. सचिन धारणकर, रामचंद्र बोरसे, पो ना मनोज दुसाने, कुणाल मराठे, प्रमोद मडलीक, सुरेश टोगांरे यांनी देवळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत देवळा ते मालेगाव मार्गावर पिंपळगाव वाखारी नजीक ( एम एच 15 जी व्ही 7623) या क्रमांकाच्या मालवाहू गाडीतून नेली जात असलेली विमल गुटखाने भरलेली 113 पोती जप्त केली. या गुटख्याची किंमत 45 लाख 26 हजार 315 रुपये असून जप्त करण्यात आलेल्या वाहनांची किंमत 12 लाख रुपये आहे.

आरोपीच्या ताब्यातून एक मोबाईलही जप्त करण्यात आला आहे . पोलीस पुढील तपास करत असून या कारवाईने खळबळ माजली आहे. चालक अतुल अशोक शिंदे ( रा.नाशिक) याला अटक करण्यात आली तर गोडाऊन मालक वाजदा (गुजराथ), खरेदी करणारे राजु कोठावदे ( रा.मालेगाव), सुनिल अमृतकर (रा.नाशिक), माँन्टी (रा.नाशिक ) यातील हे ४ आरोपी मात्र फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या आरोपींच्या विरोधात देवळा पोलीस ठाण्यात भादवि कलम .272,273, 328, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

हेही वाचा :

Back to top button