तीन शिक्षक जागीच ठार; चालत्या गाडीवर कोसळले झाड | पुढारी

तीन शिक्षक जागीच ठार; चालत्या गाडीवर कोसळले झाड

दिंडोरी; पुढारी वृत्तसेवा :

वलखेड फाट्यावर चालत्या गाडीवर झाड कोसळून तीन शिक्षक जागीच ठार झाले. नाशिक कळवण रस्त्यावर दिंडोरी नजीक वलखेड फाट्यावर आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. चालत्या आर्टिगा वाहनावर झाड कोसळून झालेल्या अपघातात अलंगुन ता सुरगाणा येथील तीन शिक्षक जागीच ठार झाले.

याबाबतचे वृत्त असे की, आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास एम. एच. एफ. एन. ०९९७ या पांढऱ्या रंगाच्या मारुती आर्टिगा वनीकडून नाशिककडे जात होती. दरम्यान, वलखेड फाट्यावर फॉर्च्यून कंपनी जवळ गाडी पोहचताच त्याच्यावर अचानक झाड कोसळले.

या अपघातात गाडीच्या मागील सीटवर बसलेले तीन शिक्षक दत्तात्रय गोकुळ बच्छाव (वय ५१ ) राहणार किशोर सूर्यवंशी मार्ग दिंडोरी रोड नाशिक. रामजी देवराम भोये (वय ४९) नाशिक नितीन सोमा तायडे( वय ३२) रा रासबिहारी लिंक रोड नाशिक. हे जागीच ठार झाले.

गाडीत पुढच्या सीटवर बसलेल्या लोकांना किरकोळ जखम झाली आहे. मयत झालेले तीनही शिक्षक सुरगाना येथील शहीद भगतसिंग माध्यमिक विद्यालय अलंगुन येथील असल्याचे समजते.

पुढील तपास दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंत तारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कल्पेश चव्हाण गो दिंडोरी पोलीस करीत आहे.

हेही वाचले का?

पाहा व्हिडिओ : कोरोना मृतांच्या शववाहिकेचे स्टेअरिंग सांभाळणारी प्रिया

Back to top button