अर्थसंकल्पात राज्याला जास्तीचा निधी द्यावा : टोपे | पुढारी

अर्थसंकल्पात राज्याला जास्तीचा निधी द्यावा : टोपे

जालना, पुढारी वृत्तसेवा : “केंद्राने राज्याच्या आरोग्य विभागाला झुकतं माप देऊन जास्तीचा निधी उपलब्ध  द्यावा. केंद्रीय पुरस्कृत मेडिकल कॉलेज मंजूर करण्यात यावे, रुग्णालय बांधकाम निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच राष्ट्रीय आरोग्य मिशनसाठी जास्तीचा निधी उपलब्ध करून देण्यात याव”, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली.

जालना येथे सोमवारी आरोग्य मंत्री राजेश टोपे माध्यमांशी बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, “कोरोनाची लस ही फक्त कोरोनावरच नाही तर इतर 21 प्रकारच्या आजारांसाठी लाभदायक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या या माहितीबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करुन जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे”, असे आवाहन करणार टोपे यांनी केले.

“दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी या निर्णयाला विरोध केला असून, ऑनलाईन परीक्षा घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी आंदोलनं सुरू केली आहेत. विद्यार्थ्यानी आंदोलनं न करता शिक्षण विभागाला सहकार्य करावे”, असे आवाहन टोपे यांनी केले.

दरम्यान, वाईन ही आरोग्यासाठी हानिकारकच असून राज्य सरकारने वाईन विक्रीबाबत घेतलेला निर्णय हा शेतीच्या दृष्टीने बघावा, असे राजेश टोपे म्हणाले. वाईन आणि गांजाची तुलना होऊ शकत नाही. त्यामुळे कुणीही अशी तुलना करू नये, असे आवाहन देखील टोपे यांनी केले आहे.

Back to top button