जळगाव : जामनेर पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन | पुढारी

जळगाव : जामनेर पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

जळगाव : प्रतिनिधी : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जामनेर पोलीस स्टेशनसाठी अद्यावत नवीन इमारत बांधण्यात आली असून बुधवारी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले.

समारोपानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील हे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या वाहनामध्ये बसून गेल्याने शहरात एकच चर्चा रंगली होती. यावेळी आमदार गिरीश महाजन, नगराध्यक्ष साधना महाजन, उपपोलिस अधीक्षक चाळीसगाव विभाग रमेश चोपडे, पाचोरा उपविभागीय अधिकारी भारत काकडे, तहसीलदार अरुण शेवाळे, पोलीस निरीक्षक किरण शिंदे, नगरपालिका मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले, पोलीस उपनिरीक्षक दीपक मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.

युती शासनाच्या काळामध्ये आमदार गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून जामनेर येथे पोलीस स्टेशनसाठी नवीन इमारत मंजूर झाली होती. त्याचे काम नुकतेच पूर्ण झाले असून यावेळी त्याचे लोकार्पण करण्यात आले. प्रसंगी आमदार गिरीश महाजन यांनी पालकमंत्र्यांकडे पोलीस स्टेशनसाठी फर्निचर व पोलीस कर्मचाऱ्यांची रहिवास कॉलनीचे नूतनीकरण करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी केली. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी फर्निचरसाठी निधी उपलब्ध केला जाणार असून येणाऱ्या काळात जीर्ण झालेल्या जामनेर येथील पोलिस कर्मचाऱ्यांच्या कॉलनी नवीन करण्यासाठी प्रस्ताव दाखल करणार असल्याची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली.

हेही वाचा :

Back to top button