जळगाव : जिल्हा प्रशासनाचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे रक्तदान करून निषेध | पुढारी

जळगाव : जिल्हा प्रशासनाचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे रक्तदान करून निषेध

जळगाव ; पुढारी वृत्‍तसेवा  

जिल्हा प्रशासन दिव्यांग व शेतकऱ्यांचे रक्त शोषित असल्‍याची टीका करीत, स्वाभिमानी संघटनेतर्फे रक्तदान आंदोलन करण्यात आले. या रक्ताच्या बाटल्या जिल्हा प्रशासन व कृषी आयुक्तांना भेट म्हणून देण्यात येणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाप्रमुख डॉक्टर विवेक सोनवणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

जिल्हा प्रशासन व कृषी विभागाच्या भोंगळ कारभारावर टीका करीत आज (बुधवार) स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे रक्तदान आंदोलनाचे आयोजित करून जिल्हा प्रशासन व कृषी विभागाचा निषेध करण्यात आला. आज सकाळी जिल्हाअधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रक्तदान आंदोलन करण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलताना डॉक्टर सोनवणे म्हणाले की, 2020 ते 2021 कृषी पीक विमा होता. त्यामधून शेतकऱ्यांची लूट करण्यात आली. याला जिल्हा प्रशासन कृषी विभाग समर्थन करीत आहेत.

20- 21 मध्ये जे चक्रीवादळाने नुकसान झाले. त्यात शंभर टक्के नुकसान झाले होते, मात्र कृषी पीक विमा कंपन्यांनी 30 ते 40 टक्केच मदत जाहीर केली. प्रत्येक तालुक्याचा गोषवारा असतानाही मुक्ताईनगर, चोपडा, भुसावळ, यावल, रावेर या तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. दहा ते वीस टक्केच मदत केली जात आहे. जेव्हा की गोषवारा 100 टक्के आहे.

डिसेंबर महिन्यात थंडी पडली होती. 86 महसूल मंडळे होती. त्यापैकी फक्त 22 महसूल मंडळांना नुकसानभरपाई देण्यात आली. यातून 64 मंडळांना वगळण्यात आल्याचा ही त्यांनी आरोप केला. थंडीची लाट एका तालुक्या पुरती मर्यादीत नव्हती. असे असतानाही पीक विमा कंपनीने व राजकीय नेत्यांनी व जिल्हा प्रशासन यांनी लागेबांधे करून शेतकऱ्यांना लुटल्‍याचा आरोप यावेळी डॉक्टर सोनवणे यांनी केला.
तर 2010 पासून दिव्यांगांसाठी ज्या कल्याणकारी योजना आहेत. त्या राबवल्या गेलेल्या नाहीत. यासाठी अनेक वेळा आंदोलने व निवेदने देण्यात आली, मात्र जिल्हा प्रशासनाने इतिवृत्त काढूनही त्याची अंमलबजावणी केली नसल्याचंही त्यांनी आरोप केला. तर जळगाव जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना जिल्हा पुरवठा अधिकारी पाठीशी घालत असून, नागरिकांना धान्य मिळत नाही. तर जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांचे, द्विव्यागांचे रक्त शोषित असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

Back to top button