नाशिक: बापरे… पाच किलो वजन असलेल्या बाळाला जन्म ; आई अन् बाळ दोघेही सुखरूप | पुढारी

नाशिक: बापरे... पाच किलो वजन असलेल्या बाळाला जन्म ; आई अन् बाळ दोघेही सुखरूप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; वोक्हार्ट हॉस्पिटल येथे तब्बल पाच किलो वजनाच्या बाळाचा सामान्य प्रसुतीद्वारे जन्म झाला आहे. वैद्यकीय क्षेत्रात आव्हानात्मक असलेली ही प्रसूती वोक्हार्ट हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सुकर केली. त्यामुळे वोक्हार्टच्या डॉक्टरांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

वोक्हार्ट हॉस्पिटल्सच्या स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र तज्ज्ञ डॉ. श्रद्धा सबनीस यांनी याबाबत सांगितले की, 30 वर्षीय साक्षी त्रिपाठी यांना गरोदरपणाच्या 37 व्या आठवड्यात कळा सुरू झाल्या होत्या. नंतर त्यांना वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आधीच मधुमेह अन् गर्भावस्थेत उच्चरक्तदाबाची समस्या उद्भवल्याने, प्रसूती करणे आव्हानात्मक होते. तसेच बाळाचे वजन अधिक असल्याने, सर्व मापदंडांचा अभ्यास करणे गरजेचे होते. दरम्यान, या महिलेला पहिले बाळ साडेतीन किलोचे झाले होते. सुरुवातीला सिझेरियन पद्धतीने बाळाचा जन्म करण्याचा विचार केला गेला. मात्र, रुग्णाने त्यास नकार दिला होता.

अखेर हायरिस्क प्रसूती असल्याने आपत्कालीन परिस्थितीमध्ये ऑपरेशन थिएटरमधील कर्मचार्‍यांना तयार केले. भूलतज्ज्ञ डॉ. किरणदीप संधू यांचीही उपस्थिती निश्चित केली गेली. सर्व व्यवस्थित घडत असताना बाळाचा खांदा अडकला. या परिस्थितीवरही मार्ग काढत आपल्या कौशल्याने डॉ. श्रद्धा सबनीस यांनी सुखरूप प्रसूती घडवून आणली. वोक्हार्टचे केंद्रप्रमुख डॉ. संदीप पटेल यांनी सांगितले की, अत्याधुनिक सुविधांसह गरोदर स्त्रियांच्या सुखरूप प्रसूतीसाठी अनुभवी स्त्रीरोग व प्रसूतितज्ज्ञ 24 तास रुग्णसेवेस उपलब्ध असतात. शिवाय नवजात बाळांच्या उपचारांसाठी नवजात शिशुतज्ज्ञ आणि नवजात शिशू अतिदक्षता विभागही कायम कार्यरत असतात.

सर्वाधिक वजनाचे बाळ
नाशिकमध्ये सामान्य प्रसूतीद्वारे जन्मलेलेे आतापर्यंतचे सर्वाधिक वजनाचे बाळ असून, आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत. वोक्हार्टच्या डॉक्टरांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर ही आव्हानात्मक प्रसूती घडवून आणली आहे.

हेही वाचा ;

पहा व्हिडिओ; कवठेमंकाळ नगरपंचायत आबांच्या बछड्यांन मैदान मारलं

 

Back to top button