जळगाव : परिवहन मंत्र्यांच्या नावावर कार ट्रान्सफर प्रकरणी तीन एजंटांना अटक | पुढारी

जळगाव : परिवहन मंत्र्यांच्या नावावर कार ट्रान्सफर प्रकरणी तीन एजंटांना अटक

जळगाव ; पुढारी वृत्‍तसेवा

आमदार संजय सावकारे यांची कार परिवहन मंत्री अनिल परब यांच्या नावावर परस्पर ट्रान्सफर केल्या प्रकरणी सायबर पोलिसांनी आरटीओतील तीन एजंटांना अटक केली.

या संदर्भात माहिती अशी की, भुसावळचे आमदार संजय सावकारे यांची कार परिवहनमंत्री अनिल परब यांच्या नावावर ट्रान्सफर केल्याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चौकशी होत आहे. या प्रकरणाचा सखोल तपास केल्यानंतर पोलिसांनी आरटीओ एजंट  अशोक विठ्ठल पाटील, अकिल शेख रहमान शेख, प्रशांत जगन्नाथ भोळे या तिघांना अटक केली आहे.

या प्रकरणी आधीच दक्षता समितीमधील सहायक परिवहन आयुक्त दिनकर मनवर व राजेंद्र मदने या यांनी आरटीओ कार्यालयात झाडाझडती घेतली. यानंतर जे. बी. कुलकर्णी, गणेश देवरे, सुनील पाटील व मनोज पाटील या चार लिपिकांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने चौकशीअंती तीन जणांना अटक केली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे यांनी दिली.

कार ट्रान्सफर प्रकरणात खोटेनगरातील अशोक पाटील यांचा मोबाइल वापरला गेला आहे. आरटीओ एजंट पप्पू भोळेने हा मोबाइल वापरल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर अकिल नावाच्या एजंटने त्यांचा मोबाइल नंबर अपडेट करून दिला असल्याची तांत्रिक माहिती सायबर पोलिसांना मिळाली हाेती.

हेही वाचलं का? 

Back to top button