पारोळा : अहिराणी गीतातून लसीकरणाबाबत जनजागृती - पुढारी

पारोळा : अहिराणी गीतातून लसीकरणाबाबत जनजागृती

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : कोरोनाचा दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढत असून तिसरी लाट भयावह मानली जात आहे. शासनाकडून दररोज मार्गदर्शक सूचना येत आहेत. मात्र नागरिक बेफिकीरपणे गर्दी करताना दिसत आहे. त्यातच ग्रामीण भागासह शहरात देखील अनेकांनी लसीकरणाचा पहिला व दुसरा डोस घेतला नसल्यामुळे प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.

नागरिकांनी लसीकरणाकडे वळावे. पारोळा तालुक्यात जास्तीत जास्त लसीकरण व्हावे. या भावनेतून शहरातील सर्वेश्वर बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी अहिराणी गीतांमधून राजू साळुंखे व सहकाऱ्यांनी लसीकरणासंदर्भात परिसरात जनजागृती केली. जास्तीत जास्त लोकांनी या गीताच्या माध्यमातून लसीकरणाचा पहिला व दुसरा डोस घ्यावा. प्रशासनास सहकार्य करावे हा त्यामागील हेतू आहे.

संजय पाटील म्हणाले, “कोरोनाची महामारीसंदर्भात शासन वेळोवेळी मार्गदर्शन सूचना जारी करीत आहे. आपण देखील सामाजिक बांधिलकी जोपासावी. या भावनेतून गीतकार साळुंकेच्या मदतीने अहिराणी भाषेतून प्रबोधन करण्याचे काम संस्था करीत आहे.”

Back to top button