Gawthi Katta : गावठी कट्टा, जिवंत काडतुस, मॅगझिन्स जप्त | पुढारी

Gawthi Katta : गावठी कट्टा, जिवंत काडतुस, मॅगझिन्स जप्त

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जामनेर शहरात खादगाव रोडवर एका व्यक्तीकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी गावठी कट्टा, जिवंत काडतुस, मॅगझिन्स जप्त केली आहे. याप्रकरणी जामनेर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (Gawthi Katta)

जामनेर तालुक्यातील डोंगरी तांडा येथे राहणारा व्यक्ती स्वतःजवळ हत्यार बाळगून असल्याची खबर स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती.

हिंगोली जि.प.तील वरिष्ठ सहाय्यकासह कार्यालयीन अधीक्षकाला २३ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

Gawthi Katta : ३० हजार रुपये किमतीचा एक गावठी कट्टा

मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार अशोक महाजन, पो. हे. कॉ महेश महाजन, पो. हे. कॉ लक्ष्मण पाटील, पो. ना. किशोर राठोड, पो. ना. रणजीत जाधव, पो. ना. श्रीकृष्ण देशमुख, पो. कॉ. विनोद पाटील, पो. कॉ. ईश्वर पाटील, चा. पो. हे. कॉ. भरत पाटील यांनी जामनेर शहरात खादगाव रोडवरील परिसरात सापळा लावला. सार्वजनिक जागी बाळू श्यामा पवार (वय २२, रा. डोहरी तांडा ता. जामनेर) यास ताब्यात घेतले.

त्याच्या जवळून कमरेला खोचलेला ३० हजार रुपये किमतीचा एक गावठी कट्टा, मॅगझिन्सह व १ हजार रुपयांची एक जिवंत काडतुसे मिळून आली. आरोपीची वैद्यकीय तपासणी व मुद्देमाल पंचनामा करुन जामनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

Back to top button