गिरीशभाऊंना पुण्याच्या बुधवार पेठेत दाखवावे लागेल : खडसे - पुढारी

गिरीशभाऊंना पुण्याच्या बुधवार पेठेत दाखवावे लागेल : खडसे

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

आमदार तथा माजी मंत्री गिरीश महाजन यांना पोलिसांकडून अटक होण्याच्या भीतीने कोरोना झाल्याचा टोला माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी लगावला. तसेच गिरीशभाऊंना पुण्याच्या बुधवार पेठेत दाखवावे लागेल, असेही ते म्हणाले. मागे खडसे यांना कोरोना झाला तेव्हा आमदार महाजन यांनी ‘खडसे यांना ईडीच्या भीतीमुळे कोरोना झाला’ अशी टीका केली होती. त्याचे उट्टे खडसे यांनी आता काढल्याची चर्चा सुरू आहे.

आमदार महाजन व खडसे यांच्यात सध्या पुन्हा शाब्दिक युद्ध रंगले आहे. आमदार महाजन यांना कोरोना झाल्यानंतर खडसे यांनी त्याविषयी शंका व्यक्‍त केली. जळगावातील मविप्र संस्थेच्या अध्यक्षांना धमकावण्यावरून काही दिवसांपूर्वी महाजन यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणी रविवारी पुणे पोलिसांनी जळगावातील पाच ठिकाणी छापे टाकले व चौकशी केली. या पार्श्‍वभूमीवर खडसे यांनी महाजन यांना टोला लगावला. त्याला प्रत्युत्तर म्हणून महाजन यांनी ‘खडसे यांना ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखवावे, अशी टीका केली. त्यावर खडसे यांनी पुन्हा पलटवार केला.

हेही वाचलंत का? 

Back to top button