नवी मुंबई विमानतळाचे मार्चमध्ये टेकऑफ

सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांची घोषणा
मार्चमध्ये नवी मुंबईचे विमानतळ सुरू झालेले असेल, अशी घोषणा सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी 'पुढारी न्यूज'च्या महासमिटमध्ये केली.
मार्चमध्ये नवी मुंबईचे विमानतळ सुरू झालेले असेल, अशी घोषणा सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी 'पुढारी न्यूज'च्या महासमिटमध्ये केली.Pudhari News Network
Published on
Updated on

मुंबई : 'मी सिडकोमध्ये रुजू झालो तेव्हा मुख्यमंत्री महोदयांनी एकच गोष्ट मला सांगितली- तुम्हाला सिडकोमध्ये पाठवतो आहे. विमानतळाचे काम दुप्पट वेगाने करा... त्यामुळे आज नवी मुंबई विमानतळाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आज कधीही भारतीय दलाची लढाऊ विमानेदेखील इथल्या धावपट्टीवर उतरू शकतील. येत्या मार्चमध्ये हे विमानतळ सुरू झालेले असेल, अशी घोषणा सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी 'पुढारी न्यूज'च्या महासमिटमध्ये केली.

अँकर अमोल जोशी यांनी महामुंबई प्रदेशातील पायाभूत सुविधांच्या उभारणीवर घेतलेल्या मुलाखतीत विजय सिंघल यांनी नवी मुंबई विमानतळाच्या उभारणीत यापूर्वीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या योगदानाचीही नोंद कृतज्ञतापूर्वक केली. सिंघल म्हणाले, भूषण गगराणी यांच्यासह बऱ्याच अधिकाऱ्यांचा सहभाग नवी मुंबई विमानतळाच्या उभारणीत राहिलेला आहे. या कामातील सर्व अडचणी दूर झालेल्या आहेत. विमानतळाचे काम आता युद्धपातळीवर सुरू आहे. सदतीसशे मीटरची धावपट्टी पूर्ण झाली आहे. वायुदलाचे सुखोई किंवा सी वन थर्टी लढाऊ विमानदेखील आता या धावपट्टीवर उतरवता येईल. तशी विनंतीही आम्ही हवाई दलाला केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी वायुदलाने इथे विमान उतरवावे असा सिडकोचा आणि शासनाचाही मानस आहे. पुढील मार्चमध्ये या विमानतळाचे उद्घाटन होईल. हे काम माझ्या काळात होईल आणि यात आजवरच्या सर्व अधिकाऱ्यांचे योगदान आहे.

सिडकोला पैशाची कमतरता नाही

सिडको आर्थिकदृष्ट्या परिपूर्ण आहे. सिडको शासनाकडून पैसा घेत नाही. स्वतःच्या पायावर उभी आहे. आपण जमीन अधिग्रहण करतो आणि भूखंड वाटप करतो. सिडकोकडे असलेल्या जमिनींच्या माध्यमातून पैसा उभारला जातो. वाशी, बेलापूर येथेही जमीन ताब्यात घेऊन, विकसित करून त्यांचे वितरण केले. शिक्षण, रुग्णालये वगैरेसारखी काही सामाजिक आरक्षणे भूखंडांसाठी ठेवली. उपलब्ध जमिनींमधून पैसा उभा केला जातो. नैना शहरही स्वबळावर उभारले जात आहे. त्यात जी जमीन रिक्त असेल तिथे विकास केंद्रे येतील, अशी माहिती देतानाच सिडकोकडे कोणत्याही कामासाठी पैशांची कमतरता नसल्याचे आश्वासक विधानही सिंघल यांनी केले.

खारघरमध्ये व्यावसायिक केंद्र

खारघर येथे ३८० एकरचे एक व्यावसायिक केंद्र उभारले जाणार आहे. त्यासाठी सर्व जमीन ताब्यात आली आहे. हे केंद्र केंद्र दुरु दुसरे बीकेसी म्हणून ओळखले जाईल. एवढेच नाही तर ते बीकेसीपेक्षाही उत्तम असेल. लॉजिस्टिक पार्कसाठीही ३०० हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. त्यापैकी १०० हेक्टर जमीन ताब्यात आली आहे. विमानतळ, जेएनपीटी आणि एमटीएचएल यांना लागून असलेल्या मोक्याच्या जागी हे इंटिग्रेटेड लॉजिस्टिक्स पार्क असणार आहे. ४० हेक्टर जमिनीवर मेडिसिटी आणणार आहे. वैद्यकीय केंद्रामध्ये अतिशय चांगल्या दर्जाची रुग्णालये उभी राहतील. तसेच शिक्षण केंद्रात शिक्षणसंस्थांसाठी जागा राखीव ठेवल्या जातील, अशी माहितीही सिंघल यांनी दिली.

नैना उभारणीचे आव्हान

नैना शहर हे एक आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले. सिडकोमध्ये रुजू झालो तेव्हा वाशी, बेलापूरप्रमाणे नैना शहरही काही प्रमाणात विकसित झालेले असेल असे मला वाटले होते. पण तोपर्यंत काहीच काम झाले नव्हते. त्यात अनेक अडचणी होत्या. ही शहर नियोजन योजना १ ते १२ अशी आहे. त्यापैकी ६पर्यंत मंजूर झाली आहे. आता नैना योजनेअंतर्गत रस्तेकामांचे मोठ्या प्रमाणावर कायदिशनिघाले आहेत. नैनाचे काम होईल की नाही वाटत होते पण आता ते कामही मार्गी लागले आहे, असे सिंघल एका प्रश्नावर म्हणाले. मुंबईवरील लोकसंख्येचा भार कमी करण्यासाठी आणखी एका शहराची निर्मिती व्हावी, या हेतूने सिडकोची स्थापना झाली आहे. वी मेक सिटीज, शहरांचे शिल्पकार असेच आपले घोषवाक्य आहे. कोणतेही नवे शहर उभारताना त्यात आव्हाने असतातच. पण आव्हानांवर मात करून पुढे जाणार असल्याचे ते म्हणाले. नवीन शहरांत सर्व सुविधा आपण पुरवणार आहोत. आणखी जे नवीन प्रकल्प आणता येतील ते आणणारच आहोत. सर्वांच्या आशीर्वादाने आपण हे आव्हान पेलू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मार्चमध्ये नवी मुंबईचे विमानतळ सुरू झालेले असेल, अशी घोषणा सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी 'पुढारी न्यूज'च्या महासमिटमध्ये केली.
किती ही अधोगती! पूज्य गायीवर अनैसर्गिक अत्याचार; व्हिडीओ देखील बनवला

मुंबई महानगर प्रदेशाची जोडणी

अटल सेतूमुळे मुंबई आणि नवी मुंबई जोडली गेली. मार्चमध्ये विमानतळ सुरू होईल. तिथपर्यंत कुलाब्याहून ३० ते ३५ मिनिटांत पोहोचता येऊ शकते. तिथून पुढे ५-६ मिनिटांत जेएनपीटी आहे. नवी मुंबई विमानतळ पूर्ण मुंबई महानगर प्रदेश जोडेल. मेट्रोमुळेही नवी मुंबई विमानतळ गाठता येईल. तिथेच जवळ जेएनपीटीही आहे. मेट्रोच्या विविध मार्गिकांमुळे जुने आणि नवे विमानतळ जोडले जाईल. मेट्रो ३ मार्गिका विमानतळाला जोडली जाईल. दहिसरवरून येणारी मेट्रो ७ मेट्रो ३ला जोडली जाईल. कल्याण ते तळोजा हा परिसर मेट्रो १२ मार्गिकने जोडला जाणार आहे. तळोजावरून एक मार्गिका मुंबईत येईल. यामुळे संपूर्ण मुंबई महानगर प्रदेश जोडला जात आहे, असल्याचे सिंघल म्हणाले.

जिथे विमानतळ आणि दळणवळणाची सुविधा असेल त्या परिसराचा विकास चांगल्या पद्धतीने होतो. दिल्लीच्या एअरोसिटीमध्ये २५-३० हॉटेल्स आहेत. तशीच एअरोसिटी आपण उभारणार आहोत. त्यासाठी जमीन ताब्यात घेतली आहे. यामुळे झपाट्याने विकास होईल. मोठ्या प्रमाणावर विकासक या भागात येत आहेत. त्यामुळे येत्या ३ वर्षात नवी मुंबईत भरघोस विकास झालेला दिसेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. एमटीएचल विमानतळ, बंदर सगळेच जवळ असल्याने विकासक आणि उद्योजक या परिसराकडे वळतील, अशी ग्वाही सिंघल यांनी या मुलाखतीत दिली.

मार्चमध्ये नवी मुंबईचे विमानतळ सुरू झालेले असेल, अशी घोषणा सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी 'पुढारी न्यूज'च्या महासमिटमध्ये केली.
PM JANMAN Scheme: नाशिकमध्ये ‌'पीएम-जनमन' योजनेला लवकरच मुहूर्त

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news