छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला धक्का: डॉ. दिनेश परदेशी यांच्या हाती मशाल

Maharashtra Politics | मातोश्रीवर आज बांधले शिवबंधन
Dr. Dinesh Pardeshi  join  Shiv Sena Thackeray group
डॉ. दिनेश परदेशी यांनी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. Shiv Sena X Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरू असलेल्या डॉ. दिनेश परदेशी यांच्या शिवसेना ठाकरे गटातील पक्षप्रवेशाला आज पूर्णविराम मिळाला. परदेशी यांनी आज (दि.२५) मातोश्रीवर पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवबंधन बांधले.

काही दिवसांपूर्वी वैजापूरचे माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांना ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने ते पक्ष सोडत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर वैजापूरमध्ये ठाकरेंचा उमेदवार कोण? याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच ठाकरेंनी शिंदेंच्या आमदाराला पराभूत करण्यासाठी वैजापूर भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी यांचा १४ सप्टेंबर रोजी वैजापूर येथे झालेल्या शिवसंवाद मेळाव्यात पक्ष प्रवेश होणार असल्याचे वृत्त होते. तसेच त्यांच्या समर्थकांकडून तशा पोस्टही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल केल्या गेल्या होत्या. मात्र काही कारणामुळे हा पक्ष प्रवेश रखडल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला होता.

मात्र, त्यांच्या पक्षप्रवेशाला अखेर पूर्ण विराम मिळाला आहे. परदेशी यांनी आज दुपारी दीडच्या सुमारास मातोश्रीवर अनेक भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह, शेकडो समर्थकांना घेऊन ठाकरेंच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. परदेशी यांच्यासह त्यांचे समर्थक रात्रीच मुंबईत दाखल झाले होते.

डॉ. दिनेश परदेशींचा राजकीय प्रवास...

सन 2001 पासून ते जवळपास आतापर्यंत वैजापूर नगरपालिकेवर डॉ. परदेशींची एकहाती सत्ता राहिली आहे. तसेच परदेशींनी काँग्रेस कडून यापूर्वी दोनदा विधानसभा लढवली आहे. या दोन्हीही निवडणुकीत परदेशींना अगदी थोडक्या मताने पराभवाच्या छायेत राहावे लागले आहे. तसेच शिंदेचे विद्यमान आमदार बोरनारे यांना आव्हान उभे करणाऱ्या उमेदवारांची यादी. परदेशींचे नाव नेहमी आघाडीवर राहिले.

Dr. Dinesh Pardeshi  join  Shiv Sena Thackeray group
शिवसेना ठाकरे गटाचा मुखेडच्या जागेवर दावा; मुंबईमध्ये आज पदाधिकाऱ्यांची बैठक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news