Maharashtra politics : राज ठाकरेंच्‍या माताेश्रीवरील बैठकीत युतीबाबत काय ठरलं? संजय राऊतांनी दिले उत्तर

अमित शहांच्‍या आदेशामुळे शेतकर्‍यांबाबत राज्‍य सरकाराची उदासीनता स्‍पष्‍ट
Raj Thackeray on Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेPudhari Photo
Published on
Updated on

Sanjay Raut ON Raj Thackeray- Uddhav Thackeray meeting : महानगरपालिका निवडणुका काही आठवड्यांवर येवून ठेपल्‍या आहेत.शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची युती लवकरच जाहीर होणार, अशा चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आले असतानाच रविवारी (दि.५) राज ठाकरे यांनी मातोश्रीला भेट दिली. मात्र ही भेट राजकीय होती की कौटुंबिक यावर खल सुरु होता. या बैठकीत नेमकी कशावर चर्चा झाली याचे उत्तर आज (दि. ६) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्‍यमांशी बोलताना दिले.

उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्‍यात राजकीय चर्चा

राज ठाकरे यांच्‍या मातोश्रीवरील भेटीबाबत बोलताना संजय राऊत म्‍हणाले की, रविवारी राज ठाकरे यांनी मातोश्रीवर भेट दिली. यावेळी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्‍यात अर्धा तास राजकीय चर्चा झाली. मनसे महाविकास आघाडीमध्‍ये सहभागी होणार का, या प्रश्‍नावर बोलताना राऊत म्‍हणाले की, "महाविकास आघाडीमध्‍ये तीन प्रमुख पक्ष आहेत. तसेच मनसे हाही एक राज्‍यातील प्रमुख पक्ष आहे. त्‍यामुळे याबाबत मी अधिकृतपणे कोणतेही भाष्‍य करु शकत नाही.

Raj Thackeray on Uddhav Thackeray
Sanjay Raut : केंद्र सरकार भयग्रस्त, गद्दारांना जबर किंमत मोजावी लागेल – संजय राऊत

उद्धव ठाकरे -राज ठाकरे यांच्यातील राजकीय नाते अत्यंत घट्ट

ठाकरे बंधू एकत्र येवू नये म्‍हणून देव पाण्‍यात बुडवून बसले आहेत. मात्र आता दोन्‍ही बंधूमधील राजकीय युतीची चर्चा पुढे गेली आहे. माघारीचे दोर आता नाहीत. कोणी कोणत्‍या मेळाव्‍यात काय बोले हे नंतर पाहूया. आतातरी ठाकरे बंधू एकत्र येण्‍याच्‍या मनस्‍थितीत आहेत. स्‍थानिक पातळीवरील प्रमुख नेतेही अंतिम टप्‍पा गाठलेला आहे, असेही राऊत यांनी स्‍पष्‍ट केले."

Raj Thackeray on Uddhav Thackeray
Sanjay Raut : भाजप देश लुटणारी टोळी, फडणवीस ‘कमिशनवाले’ मुख्यमंत्री : संजय राऊतांचा घणाघात

सर्व बाबींवर आमची चर्चा सुरु

महाराष्‍ट्रात मुंबईसह २७ महापालिका आहेत. प्रत्‍येक जागांबाबत चर्चा होणे गरजेचे आहे. त्‍याचबरोबर प्रत्‍येक महापालिकेतील राजकीय परिस्‍थिती भिन्‍न आहे. या सर्व बाबींवर आमची चर्चा होत आहे. स्‍थानिक पातळीवरील प्रमुख नेतेही चर्चा करत आहे. त्‍याचबरोबर महाविकास आघाडीचे अस्‍तित्‍व काय आहे. या आघाडीत तीन प्रमुख पक्ष आहेत. त्‍याचबरोबर मनसे हाही राज्‍यातील प्रमुख पक्ष अथाहे. यामुळे महापालिका निवडणुकीला सामोरे जाताना सर्वत्र एकच स्‍थिती नाही याचाही विचार होणार असल्‍याचे राऊत यांनी सांगितले.

Raj Thackeray on Uddhav Thackeray
Sanjay Raut : तुम्ही गोट्या खेळण्याच्या लायकीचेच.... संजय राऊत अजित पवारांच्या वक्तव्यावर कडाडले

मुंबईचा महापौर मराठी माणूस असेल

दिल्लीचा जोडे उचलणारा माणूस मुंबईचा महापौर होणार नाही. मुंबईचा महापौर मराठी माणूस असेल आणि तो अस्सल भगवा रंगाचा आणि मराठी बाणा असणारा असेल. हा बाणा शिवसेना आणि मनसे या दोन पक्षात आहे .ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, असा विश्‍वास करत ही युती फार वेगळी आहे दिल और दिमाग से बनी हुई है फक्त राजकीय युती नाही, असेही राऊत म्‍हणाले.

Raj Thackeray on Uddhav Thackeray
Sanjay Raut On India Victory : देशाला काय मूर्ख बनवताय का, हा हुताम्यांच्या रक्ताचा अपमान.... संजय राऊत एवढे का भडकले

एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष अमित शहांची बेनामी कंपनी

एकनाथ शिंदे यांचा आणि अजित पवारांचा पक्ष हा भाजप आणि अमित शहांची बेनामी कंपनी आहे, अशी बोचरी टीका करत अमित शहा यांनी रविवारी झालेल्‍या सभेत ओल्‍या दुष्‍काळाबाबत प्रस्‍ताव पाठविण्‍यास सांगितले आहे. याचा अर्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओला दुष्‍काळाचा प्रस्‍तावच केंद्र सरकारकडे पाठवलेला नाही. याचा अर्थ अमित शहा यांनीच देवेंद्र फडणवीस यांच्‍या सरकारच्‍या अकार्यक्षमतेवर शिक्‍कामोर्तब केले आहे. अमित शहा यांनी सरकारला उघड पाडले आहे, असा आराेप राऊत यांनी केला.

Raj Thackeray on Uddhav Thackeray
‘संजय राऊतांनी भाजपचे १०५ आमदार घरी बसवल्याने ‘ईडी’चा ससेमिरा’

केंद्र सरकारने महाराष्ट्राला देखील मदत केली पाहिजे

राज्‍य सरकारने ओल्‍या दुष्‍काळाबाबत ने प्रस्ताव पाठवला नसेल तरी महाराष्ट्र देखील तुमचाच एक भाग आहे ना, असा सवाल करत केंद्र सरकारने आधी गुजरातला मदत केली आहे. अशाच प्रकारची मदत महाराष्ट्राला देखील मदत केली पाहिजे, अशी मागणीही त्‍यांनी केली. विमानात बसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातला हजारो कोटी रुपये जाहीर केले. महाराष्ट्र विषयी तुमच्या मनात कोणता राग आहे एवढा महाराष्ट्र बद्दल तुमचा मनात द्वेष का आहे. शिवसेना तुम्हाला अडथळा निर्माण करत आहे म्हणून तुम्ही अशाप्रकारे मराठी माणसासोबत वाद निर्माण करत आहेत का, असा सवालही राऊत यांनी केला.

Raj Thackeray on Uddhav Thackeray
Sanjay Raut : फरहानच्या कंबरड्यात लाथ घालायला हवी होती..... संजय राऊत भडकले, पंतप्रधानांना हाणला टोला

शेतकर्‍यांपेक्षा अदानी, अंबानींवर भार लावा

आमचा शेतकरी अडचणीत आहे. तुम्ही ग्रामीण भागातील आर्थिक व्यवस्था मोडून काढत आहात.शेतकऱ्यांकडून ऊस घेणाऱ्या कारखान्यांवर तुम्ही हा भार लादण्यापेक्षा महाराष्ट्र व आखा देश ताब्यात दिला आहे व घशात घातला आहे गौतम अदानी त्यांच्यावर भार लावा. त्‍यांना एफएसआय, तेल कंपनी, मिठागर फूकट दिली; मग गौतम अदाणींवर तुम्ही भार का नाही लावत शेतकरी वर भार लावण्या पेक्षा तुम्ही अदानी, अंबानी, लोढानवर भार लावा, अशी मागणीही राऊत यांनी केली.

Raj Thackeray on Uddhav Thackeray
Sanjay Raut On Fadanvis : १९५० अन् १०४० चं बोलता, तुम्ही काय..... संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना केलं टार्गेट

कोकणातील सहकारी बँका कोण लुटतीय हे दिसत नाही का?

सिंधुदुर्ग मधील जिल्हा सहकारी बँकेतील कर्ज घोटाळा बाबत देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हा दाखल करून हे प्रकरण ED कडे सोपवले पाहिजे कोकणातील सहकारी बँका अनेक वर्ष राणेंच्या ताब्यात आहे या बँका कोण लुटत आहे हे दिसत नाही का, असा सवाल करत. राजन तेलींनी पत्र लिहिले आहे मी ते पत्र वाचले आहे राजन तेली यांनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्या अत्यंत गंभीर आहेत. पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी ॲक्शन दाखवावी. त्यांना आता एक्सटेन्शन मिळाले आहे., गुन्हेगारांना वाचवण्यासाठी राजन तेलींच्या पत्रावर त्यांनी ॲक्शन घ्यावी, अशी मागणीही राऊत यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news