मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी चकवा देत जाताना रविकांत तुपकर पोलिसांच्या ताब्यात

Raviakant Tupkar Protest | मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून हॉटेलमधून अटक
Raviakant Tupkar Protest
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना मुंबई येथे पोलिसांनी एका हॉटेलमधून अटक केली.Pudhari News Network
Published on
Updated on

मुंबई: पुढारी वृत्तसेवा : शेतकरी कर्जमुक्ती, हक्काचा पीकविमा, सोयाबीन, कापूस दरवाढीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'वर्षा' शासकीय निवासस्थानी शेतकरी नेते रविकांत तुपकर आज (दि.२३) आंदोलन करणार होते. दरम्यान, तुपकर यांना मुंबई येथे मरीन ड्राईव्ह पोलिसांनी एका हॉटेलमधून अटक केली.

तुपकरांना पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी शेतकऱ्यांनी मात्र गिरगाव चौपाटीवर आंदोलन केले. सध्या तुपकरांना आझाद मैदानातील पोलीस चौकीत आणले. त्यानंतर त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले.

शेतकरी लवकरच रस्त्यावर उतरलेले दिसतील 

मला जरी पोलिसांनी अटक केली असली तरी शेतकऱ्यांचा आवाज दाबता येणार नाही. काही दिवसांत आपल्या हक्कासाठी संपूर्ण राज्यातील शेतकरी लवकरच रस्त्यावर उतरलेले दिसतील. मात्र, ते सरकारला जड जाईल, असा इशारा यावेळी तुपकरांनी दिला.

तुपकर पोलिसांना चकवा देत मुंबईत दाखल

दरम्यान, बुलढाणा पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेत २१ ऑगस्ट २०२४ ला कलम १६८ नुसार तुपकर यांना नोटीस बजावली होती. परंतु, आमच्या हक्कासाठी आम्ही आंदोलन करणारच अशी भूमिका तुपकर यांनी जाहीर केली होती. त्यानुसार तुपकर पोलिसांना चकवा देत मुंबईत दाखल झाले होते. सगळे एकत्र गेलो. तर पकडले जाऊ त्यामुळे काही कार्यकर्ते व शेतकरी वेगवेगळ्या ग्रुपने मुंबईत दाखल होऊन आंदोलनाच्यास्थळी पोहोचतील, असे नियोजन तुपकारांचे होते. तर दुसरीकडे मुंबईत येणाऱ्या प्रत्येक मार्गावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. तरीही; पोलिसांना चकवा देऊन तुपकर मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या निवासस्थानाकडे निघाले होते. परंतु, मरीनड्राईव्ह परिसरात मरीन ड्राईव्ह पोलिसांनी तुपकरांना एका हॉटेलमधून सकाळी ताब्यात घेतले.

Raviakant Tupkar Protest
रविकांत तुपकर म्हणतात, आमचं ठरलंय, आम्ही लढणारच !

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news