मुंबई : मानखुर्द ते वाशी स्थानका दरम्यान डाऊन मार्गावरील ओव्हर हेड वायर तुटल्याने पनवेल दिशेकडील वाहतूक दोन तास विस्कळीत झाली होती. यामुळे सकाळी कामावर निघालेल्या प्रवाशांचे हाल झाले. सकाळी साडेनऊ नंतर रेल्वे सेवा पूर्ववत सुरू झाली आहे.
शनिवारी सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास धीम्या मार्गावरील ओव्हर हेड वायर तुटली. ओव्हर हेड वायर तुटल्याने पनवेल दिशेकडील लोकलची वाहतूक कोलमडली. परिणामी अप दिशेची सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक देखील रखडली. वाशी स्थानकाच्या पुढे लोकल जात नसल्याने प्रवाशांनी रुळावर उतरून चालत जाण्यास सुरुवात केली. यामुळे हार्बर वासियांचे हाल झाले. दोन तासानंतर पुन्हा वाहतूक सुरू झाली.