मुंबई : पुढारी वृत्तसेवा
मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली ते कल्याण स्थानका दरम्यान डाउन जलद मार्गांवर ओव्हर हेड वायर तुटली होती. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे प्रवाशांचे हाल झाले.
आज (सोमवार) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ठाकुर्ली ते कल्याण दरम्यान ओव्हर हेड वायर तुटली असल्याचे निदर्शनास आले. ओव्हर हेड वायर तूटल्याने अप आणि डाउन मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत ओव्हर हेड वायर दुरुस्त केली. त्यानंतर लोकलची वाहतूक सुरु झाली. परंतु गाडयांचे बंचिंग झाल्याने वाहतूक बराच काळ रखडली होती.