नवाब मलिक यांच्या मुलीचा व जावयाचा विचित्र अपघात; जावई गंभीर जखमी

एचडीआयएल वसाहत येथील घटना
Mumbai Accident
नवाब मलिक यांच्या मुलीचा व जावयाचा विचित्र अपघातFile Photo
Published on
Updated on

कुर्ला : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची मुलगी व त्यांचा जावई मंगळवारी (दि.१७) कुर्ला येथील हॉस्पीटलमध्ये चेकअप करून घरी येत होते. यादरम्यान कारमध्ये बसत असताना चालकाचा अचानक एक्सीलेटरवर पाय ठेवला गेल्याने कारसोबत काही अंतरापर्यंत फरकटत गेल्याने मलिक यांचे जावई समीर खान गंभीर जखमी झाले. याप्रकरणी कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Mumbai Accident
नवाब मलिक यांचे पुन्हा एनसीबीवर आरोप

नवाब मलिक यांची मुलगी निलोफर खान व जावई समीर खान हे मंगळवारी (दि.१७) कुर्ला येथील क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये रेग्युलर चेकअप करून परत घरी जात होते. यावेळी त्यांची कार चालक अबुल मोहम्मद सोफ अन्सारी वय (३८) चालवत होता. चेकअप होऊन निलोफर आणि समीर बाहेर आले. तेव्हा चालक कारमध्ये झोपला होता. त्यांनी गाडी रुग्णालयातून बाहेर येणाऱ्या गेटवर बोलवली. यावेळी गाडीमध्ये दोघे पती-पत्नी बसत असताना चालकाकडून अचानक एक्सीलेटरवर पाय ठेवला गेल्याने ही कार समीर खान यांना फरकटत नेऊन समोर एचडीआयएल वसाहतीच्या संरक्षण भिंतीजवळ जाऊन आदळली. या अपघातात समीर खान गंभीर जखमी झाले. तर निलोफर यांच्या हाताला दुखापत झाली आहे.

दोघांनाही क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल केले असता समीर यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून निलोफर यांच्यावर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले. सध्या समीर हे आयसीयूमध्ये असून प्रकृती त्यांची चिंताजनक आहे. या अपघातात फुटपाथवर पार्क असलेल्या तीन मोटरसायकल देखील चिरडल्या गेल्या आहेत. अपघातामधील कारचालकला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास विनोबा भावे नगर पोलीस करत आहेत.

Mumbai Accident
Nashik News | चिंताजनक! शहरातही चिमुकल्या असुरक्षित

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news