नवी मुंबई : पुढारी वृतसेवा
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नवी मुंबईतील शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात पक्षप्रवेश करत बेलापूर मतदारसंघांतून विधानसभा निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपने ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघावर दावा केल्याने बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला नवी मुंबईतील एकही जागा सुटत नसल्याने हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे विजय नाहटा यांनी सांगितले.
नाहटा आज पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही महत्वाच्या पदधिकारी आणि नेत्यांची भेट घेणार आहेत. 2019 साली नाहटा यांना माघार घ्यावी लागली होती. त्यानंतर ते उबाठा गटात होते. शिंदेंनी शिवसेना सोडली तेव्हापासून नाहटा शिंदें सोबत आहेत. पक्षबांधणी केल्यानंतर निवडणुकीत पक्षाने दावा न केल्याने भाजपच्या वाट्याला दोन्ही मतदारसंघ गेले. यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात पक्षप्रवेश करून निवडणुकीत तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेत असल्याचे नाहटा यांनी सांगितले.