मुंबई : सावत्र वडिलांकडून मुलीवर लैंगिक अत्याचार

मुंबई : सावत्र वडिलांकडून मुलीवर लैंगिक अत्याचार
Published on
Updated on

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : आईला ठार मारण्याची धमकी देत ४५ वर्षीय सावत्र पित्याने १८ वर्षीय मुलीवर लैगिक अत्याचार केल्याची घटना माहीममध्ये उघडकीस आली आहे. पोटात दुखू लागल्यानंतर मुलीने घडलेला प्रकार आईला सांगत तिच्यासोबत माहीम पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. त्यानुसार बलात्काराच्या भादंवि कलमांसह पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन माहीम पोलिसांनी आरोपी सावत्र पित्याला अटक केली आहे.

माहीम परिसरात तक्रारदार मुलगी आई आणि सावत्र वडिलांसोबत रहात होती. तिच्यावर वडिलांची वाईट नजर पडली. मुलगी घरात एकटी असताना आरोपी वडील तिच्यावर लैगिक अत्याचार करत होते. याबाबत, कुठेही वाच्यता केल्यास आईला ठार मारण्याची धमकी वडिलांनी तिला दिली होती. जानेवारी महिन्यापासून सुरु असलेले हे अत्याचार मुलगी तोंड दाबून सहन करत होती. मात्र पोटात दुखू लागल्याने मुलीने आईला सांगितले. आईने तिला रुग्णालयात नेल्यानंतर सावत्र वडिलांच्या अत्याचाराला वाचा फुटली. अखेर आईने मुलीसा सोबत घेऊन माहीम पोलीस ठाण्यात जात तक्रार दिली आहे.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news