

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने डोंबिवली, खोपोली, जुचंद्र आणि इगतपुरी स्थानकांवर प्री-फॅब्रिकेटेड सिनेडोम उभारण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता निविदा मागविण्यात आल्या असून यामुळे प्रवाशांना स्थानकाच चित्रपट पाहता येणार आहे.
स्थानकातचं प्रवाशांना विविध आधुनिक सोयी- सुविधा उपलब्ध करुन देण्यावर रेल्वे प्रशासनाने भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्थानकात सिनेडोम उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या सिनेडोममध्ये जेवण, नाश्ता, पेय्यांसह नवीनतम चित्रपट, माहितीपट प्रदर्शित करण्यासाठी एक संपूर्ण व्यवस्था असणार आहे. दहा वर्षांच्या कालावधीसाठी स्थानकात पाच हजार चौरस फूट जागेत या डोमची निर्मिती करण्यात येणार आहे. मात्र, कायमस्वरूपी बांधकाम करण्यास परवानगी दिली जाणार नाही.