मुंबई : आमदार अस्लम शेख यांच्या घराबाहेर मालाड-पश्चिम, गुडिया पाडा ऑरीस टॉवर येथे मंगळवारी मध्यरात्री हिट अँड रन ची घटना घडली. भरधाव कारने एका महिलेला कारखाली चिरडलं, त्यानंतर तिला डिव्हायडर पर्यंत फरफटत नेलं. यात तिचा जागीच मृत्यू झाला. शहाना काझी (वय २७) असे मृत महिलेचे नाव आहे. (Malad Accident)
घटनेनंतर स्थानिकांनी कार चालक अनुज सिन्हा याला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र मुजोर कार चालक रहिवाशांना पैशांची मगरुरी दाखवत पाच मिनिटात पैशाच्या जोरावर सुटून येईन, तुम्ही माझं काहीच करू शकत नाही, अस स्थानिकांना धमाकावत होता. (Malad Accident)