

मुंबई : अपहरण केलेल्या एशानअली अन्सारी या 45 वर्षांच्या कामगाराची त्याच्या तीन सहकार्यांनी हत्या केली. हत्येचा गुन्हा दाखल होताच तिन्ही आरोपींना साकीनाका पोलिसांनी अटक केली. वाजिदअली, निसारअली आणि हकीकत अली अशी या तिघांची नावे असून याच गुन्ह्यांत ते तिघेही सध्या पोलीस कोठडीत आहे.
कामासह आर्थिक वादातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले. एशानअली हा साकीनाका परिसरात राहात असून तो हातगाडी चालविण्याचे काम करतो. याच परिसरात राहणारे तिन्ही आरोपीही हातगाडी चालवितात. एशानअलीमुळे त्यांच्या कामावर परिणाम झाला होता. त्यांना काम मिळत नव्हते. त्याचा त्यांच्या मनात राग होता. त्यातून या तिघांनी एशानअलीला एक चांगले काम मिळाले आहे असे सांगून त्याचे अपहरण केले. त्याची हत्या करून त्याचा मृतदेह चेंबूरच्या छेडानगर परिसरात टाकून ते तिघेही पळून गेले होते.