मुंबईत उद्या अतिमुसळधार पावसाचा इशारा; शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

महानगरपालिका प्रशासनाकडून परिपत्रक जाहीर
Mumbai heavy rain alert
मुंबईत उद्या शाळा, महाविद्यालयांना सुट्टी
Published on
Updated on

मुंबई : हवामान विभागाने मुंबई महानगराला गुरूवारी (दि.२६) अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या गुरूवारी (दि.२६) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर हवामान विभागाने उद्या सकाळी ८.३० पर्यंत रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

Mumbai heavy rain alert
पुणे शहर, जिल्ह्यात पुढील तीन दिवस मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस बरसणार

परतीच्या पावसाने बुधवारी संध्याकाळी मुंबईत जोरदार हजेरी लावली. वाऱ्यासह मुसळधार पावसाने पूर्व-पश्चिम उपनगरात बरसायला सुरुवात केली. यामुळे रस्ते मार्गासह उपनगरीय लोकलच्या वाहतुकीला फटका बसला. लोकलचा वेग मंदावल्याने प्रवाशांना लेटमार्क सहन करावा लागला. तिन्ही मार्गावरील लोकल सेवा १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत असल्याने कामावरून घरी जाणाऱ्या मुंबईकरांना गर्दीच्या सामना करावा

विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह मुंबई आणि उपनगरात अनेक भागात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी भरल्याने रस्ते वाहतूक मंदावली. सर्वत्र वाहनाच्या रांगा लागल्या. तसेच लोकलचा वेग देखील कमी झाला. कल्याण,बदलापुर,पनवेल या भागात पावसाचा जोर जास्त असल्याने या भागातून मुंबईत येणाऱ्या लोकल विलंबाने धावत होत्या .मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील लोकल सेवा १० ते १५ मिनिटे, तर धीम्या मार्गावरील लोकल सेवा ५ ते १० मिनिटाने विलंबाने धावत होत्या. तर, हार्बर मार्गावरील लोकल सेवा ५ ते १० मिनिटाने धावत होत्या. त्यामुळे बुधवारी संध्याकाळी कामावरून घरी जाणाऱ्या मुंबईकरांना गर्दीतून प्रवास करावा लागला.

मुंबईतमध्ये 'या' ठिकाणी पडला सर्वाधिक पाऊस

  • मरोळ १७६ मिमी

  • शिवडी - १४७ मिमी

  • वडाळा - १४६ मिमी

  • अंधेरी पूर्व - १४४ मिमी

  • प्रतीक्षा नगर सायन - १४२ मिमी

  • ब्रिटानिया - १३७ मिमी

  • कुलाबा - १३१ मिमी

  • जोगेश्वरी - १२६ मिमी

  • फोर्ट - ११३ मिमी

Mumbai heavy rain alert
Rain Update : कोकण, मध्य महाराष्ट्रसह विदर्भात शुक्रवारपर्यंत मुसळधार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news