राज्याच्या नव्या सांस्कृतिक धोरणास सरकारची मान्यता

मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे File Photo
Published on
Updated on

मुंबई : राज्याचे सांस्कृतिक धोरण - 2024 ला सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असून, त्याद्वारे पुढील पाच वर्षांत सांस्कृतिक क्षेत्रातील पायाभूत सुविधा आणि वारसा संवर्धन यामधील गुंतवणुकीस आकर्षित करण्यासाठी धोरण ठरविण्यात येणार आहे.

राज्याचे सांस्कृतिक धोरण 2010 चे पुनर्विलोकन करण्यासाठी 2022 मध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीचे कार्याध्यक्ष विनय सहस्रबुद्धे होते. या समितीने तसेच विविध उपसमित्यांनी तयार केलेले धोरण मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आले. महाराष्ट्राला एक सशक्त सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळख निर्माण करून देणे, समृद्ध वारसा आणि कलेची जपणूक करणे, जागतिक पातळीवर राज्याचे सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करणे या अनुषंगाने हे सांस्कृतिक धोरण तयार करण्यात आले आहे. ऐतिहासिक ठिकाणे, कला संग्रहालये आणि साहित्य यासारख्या सांस्कृतिक संपत्तीचे संरक्षण करण्यास या धोरणात प्राधान्य देण्यात येणार आहे. स्थानिक कलाकारांचा सक्रिय सहभाग हा या धोरणाचा महत्त्वाचा भाग आहे. सांस्कृतिक वारसा परंपरांबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी उपक्रम राबविण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी वित्तीय योजना तयार केली जाणार आहे.धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी कायदेशीर चौकट तयार करण्यात येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सांस्कृतिक वारसा आणि कला यांचे संरक्षण केले जाणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news