जोगेश्वरी : अंधेरीच्या राजाच्या विसर्जन दरम्याना बोट उलटल्याची घटना जुहू समुद्रात विसर्जनादरम्यान घडली. अंधेरीचा राजाचा विसर्जनादरम्यान बोटीवर प्रमाणापेक्षा अधिक भाविक आल्याने बोट उलटली. त्यामुळे अनेक गणेशभक्त बुडाले. मात्र,त्यांना स्थानिक कोळी बांधवांनी बचावले. घटनेत एक भाविक बुडाल्याने बेशुद्ध पडला. मुंबई अनंत चतुर्दशीच्या दिवशी देशभरात बाप्पाला निरोप देण्यात आला. मात्र इच्छापूर्ती करणारा गणेश (नवसाला पावनारा) असे समजल्या जाणाऱ्या 'अंधेरीच्या राजा'चे वर्सोवा बीचवर शनिवारी (दि.21) संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विसर्जन करण्यात आले.