मुंबई : पुढारी वृत्तसेवा
मुंबईत फेरीवाल्यांची दादागिरी मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. आता हे फेरीवाले नेतेमंडळीना ही जुमानत नसून या नेतेमंडळींनाही फेरीवाल्यांच्या दादागिरीला सामोरे जावे लागत आहे. विक्रोळीत शिवसेना ठाकरे गटाचे नेते व माजी महापौर दत्ता दळवी यांना गलिच्छ भाषेत शिवीगाळ करत फेरीवाल्यांनी धकाबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे.
विक्रोळीतील मध्यवर्ती शिवसेना शाखेजवळ असलेल्या काही फेरीवाल्यांनी रस्त्यावर जागा अडवून दुकान लावले होते. त्यामुळे रस्त्यात अडचण होत असल्यामुळे माजी महापौर दत्ता दळवी यांनी तिथले प्लास्टिकचे क्रेट बाजूला केले. यामुळे फेरीवाल्यांनी दत्ता दळवी यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. या प्रकरणाचा सिसिटिव्ही देखील आता समोर आला आहे.