उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची महिलेकडून नासधूस

कार्यालयाच्या दरवाजावरील पाटीही काढून फेकली
Deputy CM Fadnavis
उपमुख्यमंत्री फडणवीस File Photo
Published on
Updated on

मुंबई : मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनाबाहेर असलेल्या त्यांच्या कार्यालयात घुसून एका अज्ञात महिलेने नासधूस केली. संतापालेल्या या महिलेने दालनाच्या दरवाजावरील फडणवीस यांच्या नावाची पाटीही काढून फेकून देत तेथून पोबारा केला. तिने कुठलीही भीती न बाळगता फडणवीस यांच्या दालनाबाहेर असलेली त्यांच्या नावाची पाटीही काढून फेकून दिली. त्यानंतर ही अज्ञात महिला पळून गेली. या घटनेवरून मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी पोलीस तसेच तेथील सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगलेच झापले.

पोलिसांना मुख्य सचिवांनी झापले

या घटनेचे वृत्त समजताच मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी फडणवीस यांच्या कार्यालयाची पाहणी केली. त्यानंतर तेथे उपस्थित असलेले पोलीस व सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर त्या संतापल्या. ही घटना घडली तेव्हा आपल्याला याची माहिती का दिली नाही. त्या महिलेला माझ्याकडे घेऊन का आला नाहीत, असा जाबही त्यांनी विचारला. दरम्यान, या घटनेचा पोलीस तपास करीत असून त्या महिलेचाही शोध घेतला जाणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news