नायर रुग्णालयातील लैंगिक छळ प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल

Eknath Shinde | डीनच्या बदलीचे, विशेष चौकशी समिती नेमण्याचे आदेश
CM Eknath Shinde statement on  Nayar Hospital scandal
नायर रुग्णालयातील लैंगिक छळ प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे.Pudhari Photo
Published on
Updated on

मुंबई, पुढारी वृत्तसेवा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बृहन्मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले असून पीडितांना न्याय मिळवून देण्याची खात्री दिली आहे.

डीनच्या बदलीचे तसेच विशेष चौकशी समिती नेमण्याचे आदेश

मुख्यमंत्र्यांनी बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांना रुग्णालयाच्या डीनची तत्काळ बदली करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्यात येणार आहे. रुग्णालयातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त उपाययोजना राबविण्यात येतील, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "आरोग्य क्षेत्रातील अशा घटना अत्यंत गंभीर आहेत. आम्ही या प्रकरणाचा तपास करून दोषींवर कडक कारवाई करू. रुग्णालयातील सर्वांसाठी एक सुरक्षित वातावरण निर्माण करणे, हे आमचे कर्तव्य आहे."

CM Eknath Shinde statement on  Nayar Hospital scandal
मुंबई : पंधरा वर्षांच्या मुलीवर तिघांकडून लैंगिक अत्याचार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news