Navi Mumbai | सिडकोची घरे झाली 'फ्री होल्ड'

नवी मुंबईसह बनवेल, उरण तालुक्यातील नागरिकांना दिलासा 
CIDCO houses
सिडकोची घरे झाली 'फ्री होल्ड' file photo
Published on
Updated on

नवी मुंबई : विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुतीच्या सरकारने नवी मुंबईसह पनवेल आणि उरण तालुक्यात सिडकोची घरे घेतलेल्या नागरिकांना सिडकोच्या माध्यमातून सिडकोची घरे फ्री होल्ड करण्याचा निर्णय घेतला आहे. सिडको निर्मल भवन येथे मंगळवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत सर्व सिडकोची घरे फ्री होल्ड करण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर केला गेला. या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

सिडकोची घरे फ्री होल्ड करण्याच्या निर्णयामुळे आता सिडको परिसरात राहणाऱ्या फ्लॅट धारकांना ट्रान्सफर फी भरण्याची गरज नाही. तसेच कन्वेंस डीड करताना लागणारी सिडको ट्रान्सफर फी पूर्णपणे माफ करण्यात आली आहे. यामुळे सिडको वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांना एक मोठा दिलासा प्राप्त झालेला आहे. सिडकोने पारित केलेल्या प्रस्तावावर पुढील तीन ते चार दिवसात कॅबिनेट मिटींगमध्ये मंजुरी निश्चित प्राप्त होण्याची ग्वाही शिरसाट यांनी  दिली.

मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी विविध सामाजिक संस्थांकडून याबाबत वारंवार मागणी होत असल्याने नवी मुंबईकरांसाठी हा ऐतिहासिक निर्णय घेतल्याचे समजते. या निर्णयामुळे सिडकोच्या घरात राहणाऱ्या फ्लॅट धारकांना घर ट्रान्सफर फी भरण्याची गरज नाही. तसेच कन्वेंस डीड करताना लागणारा सिडको ट्रान्सफर फी पूर्णपणे माफ करण्यात आली आहे. याचा फायदा नवी मुंबईसह खारघर, कंळबोली, कामोठे, खांदेश्वर, नवीन पनवेल, उलवे, द्रोणागिरी नोड मध्ये राहणा-या नागरिकांना होणार आहे. घर ट्रान्स्फर, कन्वेंस डीडसाठी लागणार खर्च वाचणार आहे. अनेक दिवसांपासून ही मागणी होती. 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news