'लाडक्‍या बहीण योजनेत खोडा घालणाऱ्यांना बहिणीच जोडा दाखवतील'

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विरोधकांवर घणाघाती टीका
Chief Minister Shinde criticized the opposition on ladki bahin scheme
'लाडक्‍या बहीण योजनेत खोडा घालणाऱ्यांना बहिणीच जोडा दाखवतील' File Photo
Published on
Updated on

पुणे : पुढारी ऑनलाईन

पुण्यातील शिवाजीनगर ते स्‍वारगेट या भूमिगत मेट्रोच्या लोकार्पण सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्‍ते पुणे मेट्राेचे ऑनलाईन स्‍वरूपात लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्‍या बहीण योजनेत खोडा घालणाऱ्यांना बहिणी जोडा दाखवतील असा घणाघात विरोधकांवर केला.

या योजनेचा राज्‍यातील लाडक्‍या बहिणींच्या कुटुंबांना हातभार लागणार आहे. लाडक्‍या बहिणींच्या संसाराला हातभार लावण्यासाठीची ही योजना आहे. ही योजना बंद होणार नाही म्‍हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनांना विरोध करणाऱ्यांवर टीकास्‍त्र साेडले. शिवाजीनगर ते स्‍वारगेट या मार्गावर ही मेट्रो धावणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भूजबळ, निलम गोऱ्हे हे उपस्‍थित होते.

पंतप्रधान मोदी यांचा लौकीक पाहून काहींच्या पोटात दुखतं. संवेदनशील पंतप्रधान कसे असतात हे मोदींनी दाखवलं. संकटं आली तरी मोदींकडून विकासाला ब्रेक नाही म्‍हणत पंतप्रधान मोदी यांच्या कार्याचा त्‍यांनी गौरव केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news