फाशी द्या म्हणणारे विरोधक आता आरोपीचीच बाजू घेत आहेत : मुख्यमंत्री शिंदे

एन्काउंटरप्रकरणाची संपूर्ण चौकशी होणार
CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बदलापूर दोन चिमुकल्यांवरील अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला तळोजा कारागृहातून बदलापूरला नेत असताना त्याने पोलिसांची बंदूक हिसकावून घेतली. या झटापटीत पोलिसांनी त्यांच्यावर गोळी झाडून त्याचा एन्काउंटर केला. याप्रकरणी विरोधकांनी हा एन्काउंटर स्क्रिप्टेट आहे, असा आरोप सरकारवर केला. त्यावर प्रत्युत्तर देताना दोन चिमुकल्यांवर अत्याचार झाला. त्यावेळी आरोपीला फाशी द्या, असे म्हणणारे आता आरोपीची बाजू घेत आहेत, ही दुर्दैवी गोष्ट आहे, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. तसेच या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला अक्षय शिंदेला तपासासाठी बदलापूरला नेण्यात येत होते. त्याच्या पहिल्या पत्नीने त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. याप्रकरणी त्याला तपासासाठी तळोजा कारागृहातून बदलापूरला चौकशीसाठी नेले जात होते. यादरम्यान त्याने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेत पोलिसांवर फायरिंग केली. यामध्ये एपीआय निलेश मोरे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेत अन्य पोलिसही जखमी झाले आहेत, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणी माध्यमांशी बोलताना सांगितले.

तसेच अक्षय शिंदे याने दोन चिमुकल्यांवर अत्याचार करून माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य केले आहे. या चिमुकल्यांवर अत्याचार झाला. त्यावेळी आरोपीला फाशी द्या, अशी मागणी विरोधक करत होते. आता तेच विरोधक या आरोपीची बाजू घेत आहेत, ही खरंच दुर्दैवी गोष्ट्र आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यात येणार आहे. अक्षय शिंदेने पोलिसांची बंदूक हिसकावून त्यांना जखमी केले. त्यावेळी पोलिसांनी स्वत :च्या बचावासाठी त्याच्यावर गोळी झाडली, असेही ते म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news