भिवंडी : तलावात बुडून दोघा मुलांचा मृत्यू

Mumbai News | एकजण बेपत्ता
Children Drowning in Lake |
भिवंडी शहरातील वऱ्हाळा तलाव या ठिकाणी पोहण्यास गेलेल्या दोघा अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला.File Photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : भिवंडी शहरातील वऱ्हाळा तलाव या ठिकाणी पोहण्यास गेलेल्या दोघा अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली. गुरुवारी सायंकाळी उशिरा दोघा मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात अग्निशामक दलास यश मिळाले. साहिल पीर मोहम्मद शेख (वय 13), गुलाम मुस्तफा मन्नान अन्सारी (वय 14), अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर दिलबर रजा सनसुलहक अन्सारी (वय 11) हा बेपत्ता आहे. हे तिघे राहत असलेल्या पीराणी पाडा शांतीनगर या परिसरात शोककळा पसरली आहे.

पीराणी पाडा शांतीनगर परिसरात राहणारे हे तिघे जण बुधवारी शाळांना सुट्टी असल्याने हे दुपार तीन वाजताच्या सुमारास घरातून गेले होते. ते घरी न परतल्याने सायंकाळी कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. तिघे जण पोहण्यासाठी वऱ्हाळ तलाव येथे गेले असल्याचे समजल्याने कुटुंबीयांनी त्या परिसरात शोध घेतला. पण ते कोठे ही आढळून न आल्याने आज कुटुंबीयांनी शांतीनगर पोलिस ठाण्यात मुलांच्या हरविल्याची माहिती दिली. त्यानंतर ही माहिती अग्निशामक दलाला दिल्यानंतर तलावात गुरुवारी शोध मोहीम सुरू केली. सायंकाळी 5 वाजता गुलाम याचा मृतदेह हाती लागल्या नंतर त्याच परिसरात रात्री 8 वाजताच्या सुमारास साहिल याचा मृतदेह आढळून आला. तर दिलबर रजा हा बेपत्ता आहे. रात्री अंधार पडल्याने शोध थांबवण्यात आला असून सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू केली जाणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Children Drowning in Lake |
सातारा : तलावात बुडून गवडीतील दोघा चिमुरड्यांचा मृत्यू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news
ताज्या बातम्या