

मुंबई : भारतीय संस्कृती आणि स्वयंपाकघरात विविध प्रकारच्या धातूंच्या आणि मातीच्या भांड्यांचा वापर शतकानुशतके होत आलेला आहे. प्रत्येक धातूचे स्वतःचे वैशिष्ट्य आहे, तसेच आरोग्य आणि चवीच्या द़ृष्टीने त्याचे काही फायदे आणि तोटे आहेत. कोणत्या भांड्यात खाणे आरोग्यदायी आहे? हा प्रश्न अनेकांना पडतो. बाजारात उपलब्ध असलेल्या सोने, चांदी, तांबे, लोखंड आणि आधुनिक स्टील यांसारख्या विविध भांड्यांच्या आरोग्यविषयक परिणामांची माहिती घेणे आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचे आहे.
तुमच्या स्वयंपाकघरातील भांडी तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम करतात, हे खालीलप्रमाणे पाहूया :
सोने : आरोग्यदायी असून, सोन्याच्या भांड्यांमध्ये ऊर्जा आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे गुणधर्म आहेत;
पण सोने खूप महाग आहे, त्यामुळे रोजच्या वापरासाठी ते शक्य नाही.
चांदी : आरोग्यदायी असून चांदीचे भांडे थंड असते आणि त्यात बॅक्टेरिया नष्ट करण्याचे गुणधर्म असतात.
चांदीच्या भांड्यातून प्रोत्साहक गोड (उत्पादने) खाऊ शकत नाही.
पितळ : (पितळ, कांस्य) : पितळ किंवा कांस्य धातूच्या भांड्यात खाल्ल्याने पचनशक्ती वाढते आणि आम्लपित्त कमी होते.
या भांड्यात दूध आणि आंबट वस्तू ठेवू नयेत.
तांबे : तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी शुद्ध होते आणि ते यकृत मजबूत करण्यास मदत करते.
तोटे : तांब्याच्या भांड्यात दाल-दूधसारख्या वस्तू ठेवू नयेत.
लोखंड : लोखंडाच्या भांड्यात स्वयंपाक केल्याने शरीरातील लोहाची कमतरता दूर होते.
लोखंडी भांडी आंबट वस्तू ठेवण्यासाठी चांगली नसतात आणि त्यांना गंज लागण्याची शक्यता असते.
स्टील : स्टीलची भांडी टिकाऊ आणि सुरक्षित असतात; पण स्टीलच्या भांड्यांचे विशेष आरोग्य फायदे नाहीत.
अॅल्युमिनियम : अॅल्युमिनियम हलके असते. अॅल्युमिनियम हे हानिकारक मानले जाते आणि त्यामुळे अल्झायमरसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो. अॅल्युमिनियमची भांडी वापरणे टाळावे.
मातीची भांडी : मातीच्या भांड्यात शिजवलेले जेवण चविष्ट असते आणि ते जेवण गरम ठेवते.
तोटे : मातीची भांडी नाजूक असल्याने ती तुटण्याची शक्यता असते आणि त्यांची जास्त काळजी घ्यावी लागते.