मुंबई : 70 लाखांचा मौल्यवान ऐवज लालबागच्या राजाचरणी अर्पण

सोने, चांदी आणि हिर्‍यांपासून बनलेल्या वस्तूंचा लिलाव
auction of gold, silver and diamond items was conducted by Raja Mandal of Lalbagh
सोने, चांदी आणि हिरे यापासून बनलेल्या वस्तूंचा लिलाव लालबागचा राजा मंडळातर्फे करण्यात आला.Pudhari File Photo
Published on
Updated on

मुंबई : सोने, चांदी आणि हिरे यापासून बनलेल्या लाखो रुपये किमतीच्या वस्तूंचा लिलाव लालबागचा राजा मंडळातर्फे शनिवारी करण्यात आला. गणेशोत्सवाच्या 11 दिवसांत गशेभक्तांनी लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेल्या या वस्तूंची विक्री करून मंडळाला किमान 70 लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले.

लालबागचा राजा पाहण्यासाठी गणेशोत्सवात प्रचंड मोठी गर्दी दरवर्षी उसळते. दर्शनासाठी जमलेली गर्दी, कार्यकर्त्यांची अरेरावी, वाद, मारामार्‍या इत्यादी गोष्टींसाठी लालबागचा राजा कितीही कुप्रसिद्ध असला, तरी येथून जाण्यापूर्वी त्याचे भक्त कोट्यवधींचे दान पेटीत टाकायला विसरत नाहीत. केवळ रोख रकमेचेच नव्हे, तर मौल्यवान वस्तूंचेही दान येथे केले जाते. यात सोन्या-चांदीचे दागिने, गदा, उंदीर, सुळे, गणपतीची मूर्ती इत्यादी विविध गोष्टींचा समावेश असतो. गणेशोत्सवानंतर या सर्व गोष्टींचा लिलाव केला जातो.

शनिवारी झालेल्या लिलावात 100 ग्रॅम सोन्याच्या बिस्किटाची किंमत 7 लाख 40 हजार रुपये ठरवण्यात आली होती. संजू जैन यांनी ही वस्तू 7 लाख 71 हजार रुपये किमतीला विकत घेतली. अन्य एका 100 ग्रॅम सोन्याच्या बिस्किटाची किंमत 7 लाख 40 हजार असताना त्याची विक्री 7 लाख 65 हजार रुपयांना झाली. चेतन जोशी यांनी ते विकत घेतले. एक हिरा 72 हजारांना विकला गेला. 65 ग्रॅम 400 मिलीग्रॅम वजनाचा सोन्याचा हार 4 लाख 57 हजारांना होता. या हाराला 4 लाख 70 हजारांची बोली लागली. 50 ग्रॅम सोन्याच्या साखळीची किंमत 3 लाख 50 हजार होती. ही साखळी 4 लाख 17 हजारांना खरेदी करण्यात आली. संध्याकाळी 6 वाजता सुरू झालेला लिलाव रात्री 9 वाजून गेले तरी सुरूच होता. प्रत्येक वस्तू खरेदी करण्यासाठी बोली लावणार्‍यांमध्ये चुरस दिसून आली. परिणामी, लालबागचा राजा मंडळाच्या पदरात 70 लाखांहून अधिक मोठे दान पडले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news