अशा घटना युपी-बिहारमध्ये होतात; बदलापूर एन्काऊंटरवर आव्हाडांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

Akshay Shinde Encounter| राज्यप्रमुखाच्या मनात आलं म्हणून एन्काऊंटर केला; आव्हाडांचा आरोप
Akshay Shinde Encounter
जितेंद्र आव्हाड file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बदलापूरच्या शाळेतील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, यातील आरोपी अक्षय शिंदेचा सोमवारी एन्काऊंटर (akshay shinde encounter) झाला. दरम्यान, हा प्रकार म्हणजे आत्महत्या की एन्काऊंटर, असा मुद्दा चर्चिला जात आहे. तसेच, या घटनेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप झडू लागले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. हातात असलेल्या आरोपीचा एन्काऊंटर कधी होत नसतो. अशा घटना फक्त युपी-बिहारमध्ये होतात. महाराष्ट्र हे कायद्याने चालणारे राज्य आहे, त्याचा युपी-बिहार करू करा, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

आव्हाड नेमकं काय म्हणाले?

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात आधीच ३ गोष्टी घडल्या. एफआयर दाखल करण्यात व अटक करण्यात उशीरझाला. पोलिसांवर दबाव आणि शाळा व संस्थाचालकांची ओळख लपवण्याचा प्रयत्न हे सुरू होता. या सगळ्या नंतर अक्षय शिंदे या आरोपीचा झालेला एन्काऊंटर हा संशयास्पद आहे, हे स्पष्ट आहे. शिंदेला शाळेतील काही गुपित माहीत होते का, असा प्रश्न उपस्थित होतो. यावरूनच शाळेची व संस्थेबद्दलची माहिती दडपण्याचा हा प्रयत्न आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी 'एक्स' पोस्टमध्ये म्हटले आहे.

हातात असलेल्या आरोपीचा एन्काऊंटर कधी होत नसतो. विरोधक म्हणून आम्ही काही आरोपीचा बचाव करत नाही. आम्हालाही हेच वाटतं, की या अक्षम्य व घृणास्पद कृत्यासाठी गुन्हेगाराला फाशीच व्हायला हवी. पण हे एन्काऊंटरसारखे स्टंट अत्यंत चुकीचे आहेत. ही काही हुकूमशाही नाही, की राज्याच्या प्रमुखाच्या मनात आलं म्हणून कोणाचा तरी एन्काऊंटर केला. ही लोकशाही आहे, आणि यात न्यायपालिकाच गुन्हेगाराला शिक्षा आणि पीडितांना न्याय देते. कायद्याप्रमाणे फाशीही देता येतेच. सरकारने जलदगती न्यायालय आणि त्याची योग्य प्रक्रिया पार पाडली असती, तर ९० दिवसांत सुद्धा फाशीची शिक्षा सुनावली गेली असती. पण या प्रकरणाच्या बाबतीत Political Heroism आणि जवळच्या माणसाला वाचवण्याच्या प्रयत्नातच सरकार सुरुवातीपासून आहे. महाराष्ट्रातील जनता असे स्टंट चांगली ओळखून आहे, असेही आव्हाड यांनी म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news