मुंबई : लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विरोधात सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना रिंगणात उतरवणे ही एक मोठी चूक होती, अशी कबुली उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली. (Maharashtra politics)
राजकारण हे पार घरामध्ये शिरू द्यायचे नसते. मागे मात्र माझ्याकडून थोडी चूक झाली. त्या काळामध्ये मी माझ्या बहिणीच्या (Supriya Sule) विरोधात सुनेत्राला (Sunetra Pawar) उभे करायला नको होते. त्यावेळेस हे केले गेले, पार्लमेंटरी बोर्डाकडून निर्णय घेतला गेला. पण एकदा बाण सुटल्यावर आपण काही करू शकत नाही. पण आज माझे मन मला सांगते, तसे व्हायला नको होते, अशी कबुली अजित पवार (Ajit Pawar) यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली. (Maharashtra politics)