मुंबई : वरळी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आदित्य ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठया प्रमाणात शिवसैनिकांसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी रॅलीत सहभागी झाले होते. (Maharashtra Assembly Polls)
यावेळी महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मोठं शक्तिप्रदर्शन करण्यात आले. शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार अरविंद सावंत, प्रियंका चतुर्वेदी, आमदार सुनील शिंदे, आमदार सचिन अहिर, माजी महापौर किशोरी पेडणेकर, माजी उपमहापौर शुभांगी वरळीकर आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.