मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आसन बदलले! | पुढारी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आसन बदलले!

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आरोग्याबाबत निर्माण झालेल्या अडचणीनंतर त्यांना विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थिती लावण्यासाठी सभागृहात वैद्यकीय सल्ल्याने काही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री अधिवेशनात उपस्थिती लावण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री विधानसभा सभागृहात ज्या आसनावर बसतात ते आसन नेहमीपेक्षा थोडे उंच करण्यात आले असून मुख्यमंत्री ज्या दरवाजातून आत प्रवेश करतात, त्या मार्गावर चालताना आधार मिळावा म्हणून स्टीलचे रेलिंग लावण्यात आले आहेत.

सर्व्हायकल स्पाईन सर्जरी झाल्यानंतर गेला दीड महिना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणत्याही सार्वजनिक बैठकीत प्रत्यक्ष उपस्थित राहिलेले नाहीत. अलीकडेच व्हीसीद्वारे ते बैठकीला हजेरी लावत आहेत. भाजपने मात्र ठाकरेंची तब्येत बरी होईपर्यंत मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार अन्य मंत्र्याकडे द्यावा, अशी मागणी लावून धरली आहे.

Back to top button