एसटी कर्मचा-यांच्या संपात फुट, अजय गुजर प्रणित संघटनेचा संप मागे | पुढारी

एसटी कर्मचा-यांच्या संपात फुट, अजय गुजर प्रणित संघटनेचा संप मागे

पुढारी ऑनलाईन डेस्क

एसटीचे शासनात विलिनीकरण करावे या मागणीसाठी राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन सुरू होते. कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या सरकारच्यावतीने पहिल्या टप्प्यात मान्य केल्या होत्या. मात्र विलिनीकरणाच्या मुद्यावरून कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवला होता. याबाबत सरकार आणि कर्मचारी संघटनांमध्ये अनेक बैठका झाल्या.

अखेर कर्मचाऱ्यांचे निलंबन, बदली, त्यांच्यावरील फोजदारी कारवाई मागे घेणे अशा विविध मुद्यांवर काही अटी व शर्तींच्या आधीन राहून हा संप मागे घेत असल्याची माहिती अजय गुजर यांनी दिली. मात्र इतर एसटी संघटनांकडून संपाबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे अजय गुजर प्रणित संघटनेने संपातून माघार घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच गुजर यांनी त्यांच्या संघटनेतील कर्मचा-यांना २२ डिसेंबर पर्यंत कामावर हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, आझाद मैदानात संप करत असलेले कर्मचारी आक्रमक झाले आहेत. त्यांनी अजय गुजर हे विकले गेले असल्याचा आरोप केला आहे. आमचा संपाचे कुणीही नेतृत्व करत नसून आम्ही एसटीच्या विलीनीकरणावर ठाम आहोत अशी भूमिका मांडली. अजय गुजर यांचा निर्णय आम्हाला मान्य नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

कामगार संपावर ठाम आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार अजय गुजर यांना पैसे देऊन फोडण्यात आले आहे. अॅड गुणरत्न सदावर्ते यांनी विलिनीकरणापर्यंत संपावर ठाम राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे संप सुरुच ठेवण्याचा पवित्रा कामगारांनी घेतला आहे.

अजय गुजर म्हणाले की…

एसटी संपला गालबोट लागलेले नाही. आम्ही शांततेत संप केला.
विलिकरणाच्या मागणीवर आम्ही आजही ठाम आहे.
विविध मुद्द्यांवर सरकारशी चर्चा केली. शरद पवार यांच्याशीही चर्चा केली. विलिनीकरणाबाबत त्रिसदस्य समितीचा जो निर्णय येईल तो मान्य असेल.
वेतन वाढीबाबत सरकारने आश्वासन दिले आहे.

Back to top button