पुढारी ऑनलाईन डेस्क
महाराष्ट्रातील भूमी अभिलेख विभागाने भूमी अभिलेख या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. प्रसिद्ध झालेल्या नोटीसनुसार, भूमी अभिलेखाच्या पदांवर 1000 हून अधिक जागा रिक्त आहेत.
यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया ९ डिसेंबरपासून सुरू झाली आहे. उमेदवार ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. अधिकृत वेबसाईट https://landrecordsrecruitment2021.in/ भेट देऊन अर्ज ऑनलाइन करायचा आहे. नोटीसनुसार, या पदाची भरती पुणे, मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर आणि औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये होणार आहे.
सूचनेनुसार, भूमी अभिलेख पदांच्या भरतीसाठी, उमेदवाराकडे सिव्हील इंजिनीअरिंग डिप्लोमाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. या पदासाठी उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल ३८ वर्षे असावे.
भूमी अभिलेख विभाग महाराष्ट्रातील भरतीमध्ये निवड झाल्यानंतर, उमेदवारांना रु.19900 ते रु.63200 प्रति महिना वेतन मिळेल.
हे ही वाचलं का?