TMC : ममतादिदी आज उद्धव ठाकरे अन् शरद पवारांची घेणार भेट | पुढारी

TMC : ममतादिदी आज उद्धव ठाकरे अन् शरद पवारांची घेणार भेट

मुंबई, पुढारी ऑनलाईन : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (TMC) आजपासून तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. दरम्यान ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या भेटी घेणार आहेत.

याशिवाय १ डिसेंबर रोजी बुधवारी मुंबईच्या काही बड्या उद्योगपतींशीही भेट होणार आहे. या दौऱ्यात मुंबईच्या उद्योगपतींसोबत होणाऱ्या भेटीमागे पश्चिम बंगालमधीलऔद्योगिक विकास घडवून आणण्याचा उद्देश आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे. यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस हे पक्ष आहेत. तीन दिवसीय दौऱ्यामध्ये मुंबईला पोहोचलेल्या पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी महाविकास आघाडीतील महत्त्वाच्या पक्षांच्या प्रमुखांच्या भेटी घेणार असल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. पण, या दौऱ्यात त्या काॅंग्रेसच्या कोणत्याही नेत्यांना भेटणार नाहीत.

तृणमूल काॅंग्रेसच्या (TMC) सुत्रांकडून सांगण्यात आलं आहे की, ममता बॅनर्जी या राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि शिवसेनेचे प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटी घेणार आहेत. यापूर्वीदेखील काॅंग्रेसद्वारे विरोधी पक्षांच्या बोलविण्यात आलेल्या बैठकीतदेखील ममता बॅनर्जी यांनी सहभाग घेतला नव्हता.

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी तृणमूल काॅंग्रेस सर्वपक्षीय बैठकीतदेखील सहभाग घेतला नव्हता आणि मंगळवारी घेण्यात आलेल्या बैठकीतदेखील तृणमूल काॅंग्रेसने सहभागी होण्यास स्पष्ट नकार दिला. तृणमूल काॅंग्रेस स्वतःची रणनिती वेगळी तयार करेल. त्यामुळे देशाच्या राजकारणात ममता बॅनर्जी यांनी काॅंग्रेस पक्षाकडे केलेलं स्पष्ट दुर्लक्ष राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

पहा व्हिडीओ : कोल्हापूरची खाद्य, वस्त्र अन् वास्तु संस्कृती सायबरमध्ये एकवटली

हे वाचलंत का?

Back to top button