साबण, डिटर्जंट, बिस्किटे महागली | पुढारी

साबण, डिटर्जंट, बिस्किटे महागली

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : कच्च्या मालाच्या किमतीतील वाढीमुळे ग्राहकोपयोगी वस्तू निर्मात्या कंपन्यांनी आपल्या उत्पादनाच्या किमती वाढविण्यास सुरुवात केली आहे. हिंदुस्तान युनिलिव्हर आणि आयटीसी यांनी त्याची सुरुवात केली असून त्यांची निवडक उत्पादने आता महाग झाली आहेत. त्यात प्रामुख्याने साबण आणि डिटर्जंटचा समावेश आहे. यामुळे व्हीलच्या एक किलो पॅकची किंमत आता 3.5% ने वाढली आहे.

निवडक उत्पादनाच्या अर्धा किलो आणि एक किलोच्या पॅकवरीळ किमतीत वाढ झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. अर्धा किलो व्हीलच्या पॅकची किंमत 2 रुपयांनी वाढली आहे. यामुळे रिन डिटर्जंट बार आणि लक्स साबण यांच्या किमतीही वाढल्या आहेत.

केवळ या दोन कंपन्यांनीच नव्हे तर संपूर्ण उद्योगाने भाव वाढवले आहेत. आयटीसीचे लक्ष किंमत व्यवस्थापन प्रभावीपणे हाताळण्यावर केंद्रित झाले आहे. खर्च कमी करण्यासाठी आणि क्षमता वाढवण्यासाठी सर्व पद्धतींचेही मूल्यांकन केले जात आहे.

जेणेकरून त्याचा संपूर्ण भार ग्राहकांवर टाकावा लागणार नाही. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, उत्पादनाची किंमत वाढवणे हा शेवटचा उपाय नाही. कारण आम्हाला शक्य तितका ग्राहकांवर आर्थिक भार टाकायचा नाही.

* जून तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर झाले, त्यावेळी व्यवस्थापनातील उच्चपदस्थांनी सांगितले की त्यांनी त्वचेची स्वच्छता, कपडे धुणे आणि चहा पोर्टफोलिओमधील उत्पादनांच्या किमती दुसर्‍यांदा वाढवल्या आहेत. बिझनेस मॉडेल वाचवण्यासाठी हे आवश्यक असल्याचे कंपनीच्या व्यवस्थापनाने म्हटले आहे.

* फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स (एफएमसीजी) कंपन्या गेल्या काही काळापासून महागाईच्या दबावाचा सामना करत आहेत. इंधनाच्या वाढत्या किमती, पाम तेलाच्या वाढत्या किमती तसेच इतर मौल्यवान वस्तूंसह वाहतुकीचा वाढता खर्च यामुळे हा दबाव आहे. त्यामुळेच अलिकडेच पार्ले प्रॉडक्ट्सने आपल्या सर्व श्रेणीतील बिस्किटांच्या किमती वाढवल्या आहेत. काही उत्पादनांमध्ये पॅकेटचे वजन कमी केले आहे.

Back to top button