बदली, निधीच्या निवेदनांवर मुख्यमंत्र्यांच्या बनावट सह्या

बदली, निधीच्या निवेदनांवर मुख्यमंत्र्यांच्या बनावट सह्या
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : अधिकार्‍यांच्या बदल्यांपासून व्यक्तिगत मदतीसाठीच्या निवेदनांवर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बनावट सह्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या बनावट सह्यांची सुमारे बारा निवेदने समोर आली आहेत. मुख्यमंत्री सचिवालयाने बुधवारी यासंदर्भात नरिमन पॉईंट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे विविध कारणांसाठी निवेदने येत असतात. दौर्‍याच्या विविध ठिकाणांपासून ते 'वर्षा' निवासस्थानीदेखील अशी निवेदने पोहोचतात. त्यावर पुढील कार्यवाहीच्या शेर्‍यासह ही निवेदने पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री सचिवालयाकडे पाठविली जातात. या निवेदनांची टपाल शाखेत नोंद होऊन त्यांची ई-ऑफिस प्रणालीत नोंद केली जाते. त्यानंतर संबंधित प्रशासकीय विभागांना ती पाठवली जातात. नुकत्याच मुख्यमंत्री सचिवालयास प्राप्त झालेल्या दहा ते बारा निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्वाक्षरी आणि शिक्के संशयास्पद व बनावट असल्याचे कर्मचार्‍यांना निदर्शनास आले. त्यांनी ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले. या सर्व प्रकरणानंतर मुख्यमंत्री सचिवालयातील कार्यालयीन कर्मचार्‍यांनीही अधिक सतर्कपणे काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news