अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण : भारती एअरटेलच्या नोडल ऑफिसरची साक्ष | पुढारी

अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण : भारती एअरटेलच्या नोडल ऑफिसरची साक्ष

पनवेल : पुढारी वृत्तसेवा

महिला पोलिस अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी शुक्रवारी भारती एअरटेल मोबाईल कंपनीचे नोडल ऑफिसर योगेश राजापूरकर यांची साक्ष पनवेल सत्र न्यायालयाच्या न्यायमूर्ती माधुरी आनंदी यांच्या समोर नोंदविण्यात आली.

यावेळी हत्याकांडातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर वापरत असलेला मोबाईल हा आमच्याच कंपनीचा होता. त्याचे सीडीआर, दिलेले 65बी चे सर्टिफिकेट्स हे दुसरे नोडल ऑफिसर मनोज पाटील यांनी दिलेले आहे. आम्ही दोघे एकत्र काम करत होतो. मी त्यांचे अक्षर आणि सही ओळखतो. सही मनोज पाटील यांचीच आहे,

अशी साक्ष योगेश राजापूरकर यांनी नोंदविली. या संदर्भात मूळ कागदपत्रे कुठे आहेत, असे या खटल्यातील विशेष सरकारी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी विचारले. त्यावर न्यायालयाने पुढील सुनावणीस सर्व मूळ कागदपत्रे न्यायालयात हजर करण्याचे आदेश राजापूरकर यांनी दिले. या सुनावणी दरम्यान न्यायालयात हजर असलेला गिरीश शामकांत राणे हा छुप्या पद्धीने व्हिडीओ शूटिंग करत असल्याचे पोलिस अधिकारी विशाल राजवाडे यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ मोबाईल आणि संबंधितास ताब्यात घेतले.

Back to top button