आजपासूनच लागा तयारीला ! एक डिसेंबरपासून शाळेची घंटा वाजणार

मराठी

file photo

[author title=”मुंबई; पुढारी ऑनलाईन” image=”http://”][/author]

एक डिसेंबरपासून शाळेची घंटा वाजणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. पहिली ते सातवीचे वर्ग एक डिसेंबरपासून सुरु होणार आहेत. १ डिसेंबरपासून पहिली ते सातवी शाळा सुरु होतील, असा निर्णय आज राज्‍यमंत्रीमंडळ बैठकीत घेण्‍यात आला. या निर्णयामुळे राज्‍यातील शहरासह ग्रामीण भागातील सर्व शाळा सुरु होणार आहेत.

सर्व शिक्षकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेणे आवश्‍यक आहे. सुरक्षित अंतर ठेवणे हे आवश्‍यक आहेत. सुरक्षित अंतर ठेवणे, मास्‍क लावणे व सॉनिटायझरचा वापर घेणे अनिवार्य असणार आहे. यासंदर्भातील सूचना शिक्षकांना देण्‍यात येणार आहे.

सक्‍ती नाही, पालकांची इच्‍छा असेल तरच शाळेला पाठवावे

पालकांना इच्‍छा असेल तर पाल्‍यांना शाळेत पाठवायचे आहे. मुलांना शाळेला पाठवयाची सक्‍ती असणार नाही, असेही राज्‍य सरकारच्‍या वतीने स्‍पष्‍ट केली आहे. येणार्‍या काळात कोरोनाचा प्रार्दूभावाचा धोका लक्षात घेवून अंमलबजावणी करावी, असेही राज्‍य सरकारने स्‍पष्‍ट केले आहे.

हे ही वाचलं का ?

Exit mobile version