अभिनेत्री माधवी गोगटे यांचे कोरोनाने निधन | पुढारी

अभिनेत्री माधवी गोगटे यांचे कोरोनाने निधन

बई : पुढारी वृत्तसेवा

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री माधवी गोगटे यांचे रविवारी सेव्हन हिल्स रुग्णालयात निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्या 58 वर्षांच्या होत्या.

दूरचित्रवाणी कार्यक्रमांमधून त्यांनी आपली कारकीर्द सुरू केली होती. अशोक सराफ यांच्यासोबत त्यांनी घनचक्कर चित्रपटात काम केले होते. त्यांची ही भूमिका प्रचंड गाजली. भ्रमाचा भोपळा, गेला माधव कुणीकडे या नाटकांतही त्यांनी कामे केली होती.

अलीकडेच त्यांनी ‘तुझं माझं जमतंय’ या मालिकेद्वारे पुन्हा छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. कोई अपनासा, ऐसा कभी सोचा न था, कहीं तो होगा या हिंदी मालिकांमध्येही त्यांनी काम केले होते.

Back to top button