पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई येथील बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूचे (एमटीएचएल) येत्या १२ जानेवरीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज 'अटल सेतू' पाहणी दौरा केला.
या प्रकल्पामुळे पनवेलपासून दक्षिण मुंबईच्या दिशेने ये-जा करणाऱ्या वाहनांचे सुमारे १५ कि.मी. इतके अंतर कमी होईल. त्याचबरोबर गर्दीच्या वेळी सुमारे दीड ते दोन तासांच्या वेळेची बचत होणार आहे. अटल सेतू उभारणीसाठी २१ हजार २०० कोटी रुपये खर्च आला आहे. १५ हजार १०० कोटी या प्रकल्पासाठी कर्ज घेण्यात आले आहे. सुमारे २५० रुपये चारचाकी वाहनांसाठी टोल असणार आहे.